lokmat Supervote 2024
Lokmat Money >विमा > Insurance : इन्शुरन्स कोणता घ्यावा, त्याची निवड कशी करावी? 'हे' सात विमा आहेत महत्त्वाचे

Insurance : इन्शुरन्स कोणता घ्यावा, त्याची निवड कशी करावी? 'हे' सात विमा आहेत महत्त्वाचे

नेमका कोणता इन्शुरन्स आपल्याला अत्यंत गरजेचा आहे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 01:45 PM2023-10-07T13:45:57+5:302023-10-07T13:47:06+5:30

नेमका कोणता इन्शुरन्स आपल्याला अत्यंत गरजेचा आहे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Which insurance to take how to choose it what it covers seven insurances are important | Insurance : इन्शुरन्स कोणता घ्यावा, त्याची निवड कशी करावी? 'हे' सात विमा आहेत महत्त्वाचे

Insurance : इन्शुरन्स कोणता घ्यावा, त्याची निवड कशी करावी? 'हे' सात विमा आहेत महत्त्वाचे

प्रितीष किशोर गोविंदपुरकर

विमा हा सर्वांसाठी आवश्यक आहे. पण नेमका कोणता इन्शुरन्स आपल्याला अत्यंत गरजेचा आहे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विमा किंवा इन्शुरन्स कोणता घ्यावा आणि त्याचा नेमका उपयोग कशासाठी होतो याचं आकलन करूनच निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात काही इन्शुरन्स असे आहेत की जे असणे खूप महत्वाचे आहेत. इन्शुरन्स बाबतीत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारदेखील सुद्धा विविध आस्थापनांद्वारे प्रयत्न करत आहे. खाली दिलेले सात इन्शुरन्स हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

१. TERM LIFE INSURANCE (टर्म लाईफ इन्शुरन्स)
सगळ्यात महत्वाचा आणि प्रत्येक घरातील कमवत्या व्यक्तीनं घ्यावा असा हा विमा प्रकार. टर्म लाईफ इन्शुरन्स ही सर्वात पारंपारीक विमा पॉलिसी आहे, ज्या मध्ये मुदतीच्या आत विमा असलेल्या व्यक्तीसोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला विम्याच्या रकमेचा लाभ मिळतो. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे. मुदत जीवन विमा पॉलिसीचा कालावधी १० वर्ष ते मृत्यू होईपर्यंत असा ठेवता येतो. याचा प्रीमियम वय आणि विमा कव्हर यावर ठरतो.
एक वाक्य आपण जे नेहमी ऐकतो -" जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी" हे या इन्शुरन्सला नक्कीच लागू होतं.

२. HEALTH INSURANCE - (हेल्थ इन्शुरन्स)
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आपल्या आरोग्याला काही झाल्यास त्याच्या उपचारास लागणार खर्च उचलण्याचं काम आरोग्य विमा करतात. आपण जर आरोग्य विमा काढला असेल तर तो आपत्कालीन परस्थितीमध्ये उपचारच्या खर्चाची  योग्य ती भरपाई देण्यास मदत करतो. आरोग्य विमा म्हणजे असा विमा आहे जो आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत, आजार किंवा अपघातामुळे वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण करतो. प्रत्येक व्यक्तीला आरोग्य विमा घेणं गरजेचं आहे. आजकाल कधीही कोणतेही आजार उद्भवत आहेत. अशा वेळी आयुष्यभराची कमाई खर्च होऊ नये असं वाटत असेल तर आरोग्य विमा घेणं उत्तम. वेगवेगळे पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. स्वतःची गरज ओळखून योग्य ते विमा कव्हर घेणं आवश्यक आहे. याचा प्रीमियम वय, आजार आणि कव्हर यावर ठरतो.


३. PERSONAL ACCIDENT INSUANCE - (पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स)
वैयक्तिक अपघात विमा घेणाऱ्यांची संख्या खुप कमी आहे, मूळात या विषय लोकांना माहितीच कमी आहे. वैयक्तीक अपघात विम्यामध्ये जर तुम्ही अॅसिसिडेन्टमुळे तात्पुरते किंवा कायम, अंशतः व पूर्णपणे शाररिक दुर्बलता आल्यास आर्थिक मदत करते. या कालावधीत उत्पन्न नसेल तर रोजच्या गरज भागविण्यासाठीची आर्थिक किरकोळ मदत यामध्ये केली जाते. कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास किंवा अपघाती मृत्यू आल्यास एक घाऊक रक्कम यामध्ये देऊ केली जाते. याची कव्हर होणारी मार्यादा व्यक्तीच्या उत्पनावर अवलूंबून आहे.


४. RETIREMENT INSUANCE  PLAN - (रिटायरमेंट इन्शुरन्स प्लॅन)
जीवनाच्या विविध पैलूचा आनंद घेण्यासाठी आज तुमच्याकडे जे आर्थिक स्थैर्य आहे, ते तुमच्या सेवानिवृत्तीनंतर सुद्धा कायम राखायचं असेल तर योग्य वेळी तुम्हाला सेवानिवृत्ती विमा योजनेमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. हा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या दुसऱ्या इंनिंगमध्ये आरामात जगण्यासाठी निधी उभारण्यासाठी मोलाचा हातभार लावतो. या मध्ये २ प्रकार आहेत एक मार्केट युनिट लिंक (MARKET UNIT LINK) आणि दुसरा ट्रेडिशनल किंवा ENDOURSEMENT खात्रीशीर बेनेइफिट्स देणारे प्लॅन आहेत. तुमच्या कमाईच्या वर्षामध्ये पद्धतीशीर गुंतवणूक करून रिटारमेंट नंतरच्या आयुष्यासाठी पैसा उभा करू शकता. यामध्ये तुम्हाला आवश्यक असेलेला निधी आणि वर्ष याप्रमाणे प्रीमियम ठरतो. लवकर वयात सुरुवात करणे योग्य असते.

५. CHILDREN INSURANCE PLAN - (चाईल्ड इन्शुरन्स प्लॅन)
बदलत्या काळात पालक आपल्या मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी लहानपणापासूनच विचार करण्यास सुरवात करतात. ही विमा योजना मुलांच्या भविष्याच्या दिशेने एक चांगला पर्याय आहे. पालकांनी त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणुकीचे आणि सुरक्षित ठेवणायचे साधन प्रदान करते. पालक आणि पाल्य दोघांना यामध्ये विमा आवरण मिळते, पालकांच्या आकस्मित मृत्यूनंतर पाल्याच्या शिक्षणाचा भर ही विमा योजना सांभाळते. मुलांच्या भविष्यातील आर्थिक योजना जसे की उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, विवाह अशा वेळास हा प्लॅन उपयोगाला येतो. मुलांसाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्याच्या जन्मनंतर लगेच ही योजना घेणे खुप गरजेचे आहे.

६. MOTOR INSURANCE - (मोटार इन्शुरन्स)
मोटार इन्शुरन्सला वाहन विमा किंवा ऑटो इन्शुरन्स असे देखील म्हणतात. हा विमा वाहनधारकाला आपल्या वाहनाला काही अनपेक्षित आणि अपघात झाल्यास होणाऱ्या आर्थिक खर्च पासून संरक्षण करते. त्या मध्ये चोरी असो, गाडीचे महत्त्वाचे पार्टस असो किंवा आग व पाण्यापासून होणारे नुकसान असो, अशा सर्व बाबींमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी याची मदत होते. आता सरकारनं वाहन विमा हा अनिर्वाय केला आहे. आपल्या गाडीचा अपघात झाला तर त्याचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी हा विमा लोक घेतात. त्यासोबत या मध्ये Third Party म्हणजे दुर्दवानं अपघात झाल्यास होणाऱ्या जीवित आणि मालमत्ता नुकसानीचं देखील संरक्षण मिळते. मानव निर्मित असो व नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे गाडीचं नुकसान यामध्ये कव्हर होतात. थर्ड पार्टी इन्शुरन्स (THIRD PARTY INSURANCE), कॉम्प्रिहेन्सिव्ह (COMPERHENSIVE INSURANCE ) आणि अॅड ऑन (ADD ON INSURANCE COVER) अशा वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर होतात.
 
७. HOME INSURANCE - (होम इन्शुरन्स)
स्वतःचे घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी खुप मेहनत आणि योजना केलेल्या असतात. असं घर सुरक्षित ठेवणं हे सुद्धा कर्तव्य आहे. गृह विमा पॉलिसी चक्रीवादळ, वादळ, वीज पडणे, भूकंप, पूर, भूस्खलन, त्सुनामी, हिमस्खलन, आग, दहशतवादी हल्ले, घरफोडी, चोरी, यांसारख्या मानवनिर्मित आपत्तींसह, नैसर्गिक आपत्तींसह विविध अप्रिय परिस्थितींपासून घराचे संरक्षण देतात. मालमत्तेची विमा पॉलिसी या आपत्तींच्या विरोधात प्रतिपूर्तीद्वारे संरक्षण देईल आणि तुमच्या मालमत्तेची पुनर्बांधणी करण्यात मदत करेल. पुढे, गृह विमा पॉलिसी विविध प्रकारच्या असतात आणि त्या सामान्यतः विशिष्ट कव्हर देतात. जर तुम्हाला आपत्तींच्या गटापासून संरक्षण मिळवायचं असेल तर तुम्हाला सानुकूलित मालमत्ता विमा पॉलिसी खरेदी करावी लागेल. या विम्याचा प्रीमियम घराच्या किंमतीवर ठरत असतो.

 वरील सर्व इन्शुरन्स प्रकार आपल्याला येणाऱ्या संकटामध्ये आर्थिक पाठबळ देतात. मानसिक आणि शारिरीक नुकसान हे थांबता येऊ शकत नाही. पण आर्थिक नुकसान तरी योग्य योजनेचा वापर करून कमी करू शकतो. विम्याचा योग्य तो वापर होणे गरजेचे आहे. या शिवाय इन्शुरन्सचे खुप असे प्रकार आहेत जे आपल्याला आर्थिक बाळ देतात.

(लेखक हे विमा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Which insurance to take how to choose it what it covers seven insurances are important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.