आर्थिक जबाबदाऱ्या वाढत असताना आणि दीर्घकालीन अनिश्चितता वाढत असतानाच ग्राहक संरक्षण आणि बचत अशा दोन्ही सुविधा देणाऱ्या उपायांच्या शोधात आहेत. आत्मविश्वासाने आणि शांतपणे भविष्याचे नियोजन करण्यासाठी, बचतीसाठी योग्य तसेच आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी एक साधी, विश्वासार्ह विमा योजना निवडण्याची गरज आहे.
एसबीआय लाइफ - न्यू स्मार्ट समृद्धी हे एक व्यक्तिगत, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग जीवन विमा बचत उत्पादन आहे, जे खात्रीशीर फायदे देण्यासाठी तयार केले आहे. शिस्तबद्ध, ध्येयावर आधारित बचतीला हे उत्पादन प्रोत्साहन देते, ज्यामुळे संतुलित आर्थिक नियोजनाचा हेतू पूर्ण होतो: विश्वसनीय आर्थिक संरक्षण देण्यासोबतच बचतीतही वाढ करणे.
प्रमुख फायदे:
- खात्रीशीर बचत: अल्प-मुदतीची आणि दीर्घ-मुदतीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध बचत.
- विश्वसनीय संरक्षण: अचानक उद्भवलेल्या अडचणीच्या घटनांच्या वेळी जीवन विमा तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा निश्चित करतो.
- दुहेरी फायदा: संरक्षण आणि बचतीचा समन्वय साधणारी एकच योजना, ज्यामुळे आर्थिक नियोजन सोपे होते.
- मनःशांती: खात्रीशीर परतावा तुम्हाला आत्मविश्वासाने नियोजन करण्यास मदत करतो.
मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे:
- खात्रीशीर वाढ: वार्षिक प्रीमियमवर# आधारित, भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 5.5% किंवा 6% च्या साध्या दराने दरवर्षी वाढ जमा होते.
- खात्रीशीर मॅच्युरिटी लाभ: वय, वार्षिक प्रीमियम# आणि प्रीमियम भरण्याच्या मुदतीनुसार, वार्षिक प्रीमियमच्या# बेरजेच्या 133% ते 214% पर्यंत लाभ.
- वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही: किमान कागदपत्रांसह त्रासमुक्त नोंदणी.
- प्रीमियम आणि पॉलिसीच्या सोईस्कर अटी: अनुक्रमे 12, 15, किंवा 20 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसह 6, 7, किंवा 10 वर्षे प्रीमियम भरण्याची मुभा.
- पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत जीवन संरक्षण: पॉलिसी दरम्यान कोणत्याही वेळी विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते.
- कर लाभ: सध्याच्या आयकर कायद्यांनुसार.
मुलांच्या शिक्षणाचे नियोजन करणाऱ्या कुटुंबांसाठी, खात्रीशीर मिळणारे अतिरिक्त फायदे आणि मुदतपूर्तीवरील रक्कम भविष्यातील निधीबद्दल स्पष्टता देतात. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी, हे खात्रीशीर फायदे एक सुरक्षा कवच देतात. ज्यावर बाजारातील चढ-उतारांचा कसलाही परिणाम न होता ते स्वतंत्रपणे, सातत्याने वाढत जाते. कमी कालावधीच्या प्रीमियम भरण्याच्या पर्यायांमुळे तरुणांना फायदा होतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध बचतीची सवय रूजते.
कुटुंबाच्या इच्छा जपतानाच व्यक्तिगत स्वप्ने पूर्ण करण्याला एसबीआय लाइफने नेहमीच प्राधान्य दिले आहे. खात्रीशीर परतावा, लवचिक पेमेंट पर्याय आणि सोप्या नोंदणीद्वारे अंगभूत संरक्षणाच्या या तत्त्वज्ञानाला एसबीआय लाइफ- न्यू स्मार्ट समृद्धी ही योजना मूर्त रूप देते. हा एक भविष्यासाठी योग्य बचत उपाय आहे, जो व्यक्तींना जीवनाच्या सर्व टप्प्यांवर सुरक्षितपणे, पद्धतशीरपणे आणि आत्मविश्वासाने संपत्ती निर्मितीसाठी मदत करतो
