LIC Q2 Result: भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालानुसार, कंपनीचा नफा तब्बल 31% ने वाढून ₹10,098 कोटींवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत ₹7,728 कोटी होता.
प्रीमियममध्ये वाढ
या कालावधीत नवीन पॉलिसींच्या प्रीमियम उत्पन्नात 5.5% वाढ झाली आहे. म्हणजेच, दुसऱ्या तिमाहीत LIC ला ₹1,26,930 कोटींचे प्रीमियम उत्पन्न मिळाले, जे मागील वर्षी ₹1,20,326 कोटी होते. मात्र, कंपनीचा टॅक्सनंतरचा नफा तिमाही-दर-तिमाही तुलनेत 8% नी घटला आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा ₹10,957 कोटी होता.
तिमाही कामगिरीचा तपशील
पहिल्या वर्षाचा प्रीमियम (Q2FY26) - ₹10,884 कोटी
(Q1FY26 मध्ये ₹7,566 कोटी, Q2FY25 मध्ये ₹11,245 कोटी)
रिन्यूअल प्रीमियम - ₹65,320 कोटी
(Q1FY26 मध्ये ₹60,179 कोटी, Q2FY25 मध्ये ₹62,236 कोटी)
सिंगल प्रीमियम - ₹50,882 कोटी
(Q1FY26 मध्ये ₹52,008 कोटी, Q2FY25 मध्ये ₹46,997 कोटी)
एकूण उत्पन्नात (टॉपलाइन) 6% वाढ झाली असून, एप्रिल-जून तिमाहीतील ₹1,19,618 कोटींवरुन आता ₹1,26,930 कोटींवर पोहोचले आहे.
सहामाहीत 16% नफ्याची झेप
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीत (H1FY26) LIC चा एकूण नफा 16% वाढून ₹21,040 कोटींवर गेला आहे. तर, एकूण प्रीमियम उत्पन्नही 5% वाढून ₹2,45,680 कोटी झाले आहे.
नॉन-पार आणि ग्रुप व्यवसायात मजबुती
नॉन-पार APE 30.47% वाढून ₹6,234 कोटी झाला
ग्रुप व्यवसायाचा APE 20.30% वाढून ₹11,864 कोटी झाला
एकूण APE 3.6% वाढून ₹29,034 कोटी झाला
नव्या व्यवसायाचे मूल्य (VNB) 12.3% वाढून ₹5,111 कोटी झाले
VNB मार्जिन 140 बेसिस पॉईंटने वाढून 17.6% झाले
खर्चाचा एकूण अनुपात FY25 च्या 12.74% वरुन कमी होऊन, FY26 च्या पहिल्या सहामाहीत 11.28% झाला आहे.
संपत्ती आणि सॉल्व्हन्सी रेशियोतही सुधारणा
एलआयसीचे एकूण AUM 3.31% वाढून ₹57.23 लाख कोटींवर गेले आहे. तसेच, कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशियो 1.98 वरून 2.13 झाला आहे, जो आर्थिक स्थैर्य दर्शवतो.
