Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >विमा > कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जीवन विमा कंपनी कशी निवडावी?

कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जीवन विमा कंपनी कशी निवडावी?

केवळ स्वस्त विमा न पाहता विश्वासार्ह विमा कंपनी निवडणे अधिक महत्त्वाचे ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 07:10 IST2026-01-07T07:10:07+5:302026-01-07T07:10:19+5:30

केवळ स्वस्त विमा न पाहता विश्वासार्ह विमा कंपनी निवडणे अधिक महत्त्वाचे ठरते.

how to choose a life insurance company for family safety | कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जीवन विमा कंपनी कशी निवडावी?

कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जीवन विमा कंपनी कशी निवडावी?

जीवन विमा घेताना अनेकजण फक्त प्रीमियम किती आहे, याकडे पाहतात. मात्र जीवन विमा हा अनेकदा २० ते ३० वर्षांचा करार असतो. त्यामुळे केवळ स्वस्त विमा न पाहता विश्वासार्ह विमा कंपनी निवडणे अधिक महत्त्वाचे ठरते.

जीवन विमा कंपनी ठरवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्यात, यावर एक नजर टाकू या.

१. क्लेम सेटलमेंट रेशो

विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासावा. म्हणजे कंपनीकडे आलेल्या दाव्यांपैकी किती दावे वेळेत निकाली निघाले, याचे हे प्रमाण पाहावे. 

२. कंपनीची आर्थिक क्षमता

जीवन विमा दीर्घकालीन असल्याने कंपनीची आर्थिक क्षमताही महत्त्वाची ठरते. मजबूत आर्थिक स्थिती असलेली कंपनी भविष्यातही दावा देऊ शकते. 

३. सोप्या योजना

विमा पॉलिसी सोप्या आणि स्पष्ट अटींची असावी. 

४. स्वस्त हवे की मौल्यवान?

स्वस्त प्रीमियमपेक्षा मूल्य मिळते का, हे पाहणे गरजेचे आहे. चांगली सेवा, सुलभ प्रक्रिया व मदतीचा हात असलेली कंपनी थोडी महाग असली तरी उपयोगाची ठरते.

५. ग्राहकसेवा, मार्गदर्शन

दावा करताना कुटुंब आधीच तणावात असते. अशावेळी ग्राहकसेवा, मार्गदर्शन आणि सहकार्य देणारी कंपनी फार महत्त्वाची ठरते. शेवटी, जीवन विमा म्हणजे स्वस्त सौदा नव्हे, तर दीर्घकाळाची मानसिक शांतता आहे.
 

Web Title : परिवार की सुरक्षा के लिए जीवन बीमा कंपनी कैसे चुनें: मुख्य कारक

Web Summary : सस्ते प्रीमियम से ज़्यादा भरोसेमंद जीवन बीमा कंपनी को प्राथमिकता दें। दावा निपटान अनुपात, वित्तीय ताकत, पॉलिसी की सरलता और ग्राहक सेवा पर विचार करें। मानसिक शांति को महत्व दें।

Web Title : Choosing a Life Insurance Company for Family's Security: Key Factors

Web Summary : Prioritize a reliable life insurance company over just cheap premiums. Consider claim settlement ratio, financial strength, policy simplicity, and customer service. Value peace of mind.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.