Insurance Policy Claim Rules: विमा पॉलिसी घेतल्यावर अनेकांना वाटते की वेळ आल्यावर क्लेम आपोआप मंजूर होईल; पण क्लेम मंजूर होण्यासाठी खरे तर अनेक छोटे-मोठे नियम पाळणे गरजेचे असते.
प्रामुख्याने आरोग्य विम्यामध्ये थोडीशी चूकही क्लेम नाकारण्यास कारणीभूत ठरू शकते. याशिवाय काही मुद्दे जीवन विमा, वाहन विमा किंवा अन्य विमा पॉलिसींसाठीही महत्त्वाचे आहेत. पुढे दिलेल्या चुका टाळल्यास क्लेमची प्रक्रिया सोपी, जलद आणि यशस्वी होते.
५ नियम पाळा, निश्चिंत व्हा
- पॉलिसी घेताना खोटी माहिती दिल्यास क्लेम नाकारला जातो. आवश्यक कागदपत्रे पूर्ण न दिल्यास क्लेम अडकतो.
- विम्याचा प्रीमिअम चुकल्यास पॉलिसी निष्क्रिय होते. क्लेम करण्यास उशीर केल्यासही तो नाकारला जातो.
- विम्याचा प्रीमिअम चुकल्यास पॉलिसी निष्क्रिय होते. क्लेम करण्यास उशीर केल्यासही तो नाकारला जातो.
- ॲडमिट झाल्यावर लगेच इन्शुरन्स कंपनीला सूचना द्या. बिल अथवा इतर बनावट कागदपत्रांमुळे क्लेम कायमचा रद्द होऊ शकतो.
- कव्हर नसलेल्या गोष्टींसाठी क्लेम करू नका. क्लेम फॉर्म काळजीपूर्वक भरा, चुका टाळा.