Infosys To Benefit 5076 Crore Rupees, Will Provide Jobs To 26000 Youth | खूशखबर! Infosys ला ५ हजार ७६ कोटींचा नफा; २६ हजार तरूणांना यंदा नोकरी देणार  

खूशखबर! Infosys ला ५ हजार ७६ कोटींचा नफा; २६ हजार तरूणांना यंदा नोकरी देणार  

ठळक मुद्देलसीकरण कार्यक्रम आणि गतिमान आर्थिक सुधारणेच्या अपेक्षेने यंदा कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत.टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखापर्यंत पोहचली. त्याचसोबत ही कर्मचाऱ्यांच्या एसेंचर तुलनेत दुसरी मोठी आयटी कंपनी बनली आहे.मार्चपर्यंत टीसीएसमध्ये ४ लाख ८८ हजार ६४९ कर्मचारी होते. कंपनी ४० हजार नोकर भरती करणार आहे.

पुणे – दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचा निव्वळ नफा मार्चच्या तिमाहीमध्ये १७.५ टक्क्यांनी वाढून ५ हजार ७६ कोटी इतका झालेला आहे. त्यामुळे या कंपनीने २०२१ मध्ये २६ हजार नोकर भरती करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी जानेवारी-मार्चमध्ये निव्वळ नफा ४ हजार ३२१ कोटी इतका झाला आहे. इन्फोसिसने बुधवारी वर्क फ्रॉम होममुळे आयटी सेवांच्या जादा मागणीमुळे नफा वाढला असल्याचं सांगितले.

आयटी सेवेची मागणी वाढल्याने यंदा कंपनी नवीन नोकर भरती करण्यावर भर देणार आहे. कंपनीला २०२१-२२ च्या महसुलात १४ टक्के नफा होण्याचा अंदाज आहेत. मार्चच्या तिमाहीमध्ये उलाढाल १३.१ टक्क्यांनी २६ हजार ३११ इतकी झाली. कंपनीचे सीईओ सलिल पारेख म्हणाले की, या वर्षी भारतासह जागतिक स्तरावर २६ हजार तरूणांना रोजगार देणार आहोत. कंपनी १७५० रुपये दरावर ९,२०० कोटींचे शेअर्स बायबॅक करणार आहे.

जूनपर्यंत टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखापर्यंत पोहचली. त्याचसोबत ही कर्मचाऱ्यांच्या एसेंचर तुलनेत दुसरी मोठी आयटी कंपनी बनली आहे. देशात रेल्वेनंतर सर्वात मोठी कंपनी आहे. एसेंचरकडे ५ लाख ३७ हजार तर रेल्वेकडे १२.५४ हजार कर्मचारी आहेत. मार्चपर्यंत टीसीएसमध्ये ४ लाख ८८ हजार ६४९ कर्मचारी होते. कंपनी ४० हजार नोकर भरती करणार आहे.

लसीकरण कार्यक्रम आणि गतिमान आर्थिक सुधारणेच्या अपेक्षेने यंदा कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत. ओएलएक्सच्या सर्व्हेनुसार, आयटी, ई कॉमर्स मॅन्यूफॅक्चरिंग इन लॉजिस्टिक आणि एफएमसीजीसह अन्य क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत. १६ टक्के कंपन्यांचे म्हणणे आहे की, ते यंदा १०० टक्के क्षमतेने नवीन नोकरी भरती करणार आहेत.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Infosys To Benefit 5076 Crore Rupees, Will Provide Jobs To 26000 Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.