काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे दहतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, यानंतर देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. पहलगाम हल्ल्याच्या दिवशी इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोबलच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला. त्यानंतर आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये १९,००० कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांकडून हवाई हल्ले होत आहेत. अशा तऱ्हेने भारताने देशातील अनेक विमानतळांवरील उड्डाणांवर बंदी घातलीये. ज्याचा परिणाम इंटरग्लोबल एव्हिएशनच्या शेअर्सवर दिसून येतोय. गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली.
रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?
सरकारची मोठी घोषणा
उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण २७ विमानतळं शनिवारी, १० मे रोजी पहाटे ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत व्यावसायिक कामकाजासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. विमानतळ बंद केल्याच्या निर्णयानंतर भारतीय विमान कंपन्यांनी गुरुवारी ४३० उड्डाणं रद्द केली, जी एकूण नियोजित उड्डाणांच्या सुमारे ३ टक्के आहे. पाकिस्तानातील विमान कंपन्यांनी १४७ हून अधिक उड्डाणे रद्द केली, जी त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकाच्या १७ टक्के होती.
जागतिक फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटरडार २४ नं पाकिस्तान आणि भारताच्या पश्चिम कॉरिडॉरवरील हवाई क्षेत्र - काश्मीर ते गुजरात - गुरुवारी मोठ्या प्रमाणात नागरी विमानांवर परिणाम झाल्याचे संकेत दिले. लाइव्ह फ्लाइट पाथ डेटा आणि कॅन्सलेशन डेटा शेअर करताना प्लॅटफॉर्मनं पाकिस्तान आणि काश्मीर-गुजरात दरम्यान भारताच्या सर्वात पश्चिम पट्ट्यावरील हवाई क्षेत्र नागरी हवाई रहदारीपासून मुक्त असल्याचं
इंडिगोला १९ हजार कोटींचा तोटा
विशेष म्हणजे २२ एप्रिलपासून इंडिगोच्या मूळ कंपनीला १९,००० कोटी रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे. शेअर बाजारातून मार्केट कॅपमध्ये घसरण झाल्यानं हा तोटा झाला आहे. या आकडेवारीवरून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. २२ एप्रिल रोजी जेव्हा कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप २,१८,२१८.४४ कोटी रुपयांवर आलं. गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचं मार्केट कॅप १,९८,८२६.९२ कोटी रुपये होतं. म्हणजेच सुमारे १७ दिवसांत इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या मार्केट कॅपमध्ये १९,३९१.५२ कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)