Pan Card Number Details: आजच्या काळात पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनलं आहे. बँक खातं उघडण्यापासून ते आयकर परतावा (ITR) भरण्यापर्यंतच्या प्रत्येक लहान-मोठ्या आर्थिक कामात पॅन कार्डचा वापर होतो. प्रत्येक पॅन कार्डवर १० अंकी एक विशिष्ट क्रमांक लिहिलेला असतो, ज्याला 'अल्फा-न्यूमेरिक' नंबर म्हटलं जातं. अनेक लोकांना या १० अंकी क्रमांकाचा नेमका अर्थ माहीत नसतो, परंतु यातील प्रत्येक अंकाचा एक विशिष्ट अर्थ असतो. पॅन कार्डमधील पहिले तीन अंक हे इंग्रजी अक्षरे असतात, जे A पासून Z पर्यंत कोणतंही असू शकतात.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पॅन कार्डचे पहिले तीन डिजीट अक्षरं असतात. ते A ते Z पर्यंतचे कोणतेही अंक असू शकतात. पॅन कार्ड क्रमांकाचा चौथा अंक कार्डधारकाच्या श्रेणी दर्शवितो. उदाहरणार्थ, P म्हणजे वैयक्तिक आणि F म्हणजे फर्म. पॅन कार्डचा चौथा अंक P किंवा F असतो.
पॅन कार्डावर कार्डधारकाचं नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असते. परंतु पॅन कार्डच्या नंबरमध्ये तुमचं आडनावही असतं. पॅन कार्डाचं पाचवं डिजिट तुमचं आडनाव दर्शवतं. इन्कम टॅक विभाग कार्डधारकाच्या आडनावालाच आपल्या डेटामध्ये नोंद करून ठेवतं. यासाठीच अकाऊंट नंबरपमध्ये त्याची माहिती असते. याची माहिती टॅक्स डिपार्टमेंट कार्डधारकाला देत नाही.
पॅन कार्ड क्रमांक हा १० अंकी खास क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येतो. जे लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना आयकर विभाग ते जारी करतो. पॅनकार्ड बनल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅनकार्डशी लिंक केले जातात. यामध्ये कर भरणा, क्रेडिट कार्डद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे सर्व विभागाच्या देखरेखीखाली होते.
'टॅरिफवाढ स्वीकारणार नाही', EU ची ट्रम्प यांच्या निर्णयावर कठोर भूमिका; भारतानं घेतला 'हा' निर्णय
विभाग ठरवतो नंबर
या नंबरच्या सुरुवातीचे तीन डिजीट इंग्रजी अक्षरं असतात. हे AAA पासून ZZZ पर्यंत कोणतेही असू शकतात. सध्या सुरु असलेल्या सीरिजनुसार ते ठरवले जातात. विभाग आपल्या प्रमाणे ते ठरवत असतं. पॅन नंबरचं चौथं डिजीटही एक अक्षर असतं. परंतु ते कार्डधारकाचं स्टेटस सांगतं. यामध्ये चौथं डिजीट खालील पैकी काहीही असू शकतं.
P - सिंगल पर्सन
F - फर्म
C - कंपनी
A - एसोसिएशन ऑफ पर्सन
T - ट्रस्ट
H - हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली
B - बॉडी ऑफ इंडिविज्युअल
L - लोकल
J - आर्टिफिशिअल ज्युडिशिअल पर्सन
G - सरकारसाठी
पाचव्या डिजीटमध्ये आडनाव
पॅन कार्डाच्या पाचव्या डिजीट म्हणजे इंग्रजी अक्षरच असतं. ते तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर असतं. यानंतर पॅन कार्डात चार क्रमांक असतात. ते ०००१ पासून ९९९९ पर्यंत कोणतेही असू शकतात. तुमच्या पॅन कार्डाचे नंबर्स सीरिज दर्शवतात. याचं अखेरचं डिजीट एक अल्फाबेट असतं, जे कोणतंही लेटर असू शकतं. दरम्यान, आर्थिक व्यवहारासांठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पत्ता बदलला तरी पॅन कार्डाचा क्रमांक बदलत नाही. पॅन कार्ड हे एका आयडीच्या स्वरूपातही वापरू शकता.
