PAN-Aadhaar Linking Last Date: पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही आजच्या काळात सर्वात महत्त्वाची कागदपत्रं आहेत. आधार कार्डचा वापर प्रत्येक लहान-मोठ्या कामात होतो, तर पॅन कार्डचा वापर जवळजवळ सर्व आर्थिक कामांसाठी केला जातो.
अशा परिस्थितीत, सरकारनं म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (CBDT) आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. त्यामुळे आता प्रत्येक व्यक्तीसाठी आपले आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करणं आवश्यक आहे.
अंतिम मुदत ३१ डिसेंबर
सरकारनं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित केली आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीनं या अंतिम मुदतीपर्यंत आपले पॅन-आधार लिंक केलं नाही, तर त्याचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं, ज्यामुळे त्या व्यक्तीची अनेक आर्थिक आणि इतर कामं थांबू शकतात.
३१ डिसेंबरनंतरही लिंक करता येईल का?
३१ डिसेंबरची अंतिम मुदत चुकल्यानंतर तुमचं पॅन कार्ड इनॲक्टिव्ह केलं जाईल, पण तरीही तुम्ही आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता, पॅन पुन्हा ॲक्टिव्ह करू शकता. मात्र, यासाठी ३० दिवसांचा वेळ लागू शकतो.
अंतिम मुदत चुकल्यास दंड
जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत आपले पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही, तर यासाठी तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. हा दंड ₹१००० पर्यंत असू शकतो.
पॅन-आधार लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सर्वात आधी आयकर विभागाच्या incometax.gov.in या वेबसाइटवर जा.
- आता होमपेजवरील 'Quick Links' विभागात जा आणि 'Link Aadhaar' हा पर्याय निवडा.
- आता आपल्या आधार कार्ड आणि पॅन कार्डनुसार आपलं नाव एन्टर करा आणि पुढे जा.
- दोन्ही लिंक करण्यासाठी काही शुल्क मागितलं असल्यास, तुम्ही ते कोणत्याही ऑनलाइन पद्धतीने भरू शकता.
- पेमेंट करा आणि 'Submit' वर क्लिक करा.
- पेमेंट झाल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होईल.
