Lokmat Money >आयकर > Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या

Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या

Income Tax Return: आयकर विभागाने आधीच आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली होती. परंतु जर तुम्ही अंतिम मुदत चुकवली तर तुम्हाला अनेक प्रकारच्या दंडासह काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:48 IST2025-09-04T14:47:22+5:302025-09-04T14:48:07+5:30

Income Tax Return: आयकर विभागाने आधीच आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली होती. परंतु जर तुम्ही अंतिम मुदत चुकवली तर तुम्हाला अनेक प्रकारच्या दंडासह काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

The deadline to file Income Tax Return is September 15 What will happen if you miss the date Know | Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या

Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या

Income Tax Return: आयकर विभागाने आधीच आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली होती. पूर्वी याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत होती, परंतु यावेळी १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर दाखल करता येणार आहे. विभागानं मे महिन्यातच एक्स-पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे की टॅक्स ऑडिटची अंतिम मुदत अजूनही ३० सप्टेंबर आहे.

आकडेवारीवरून असं दिसून येतं की किमान ३ कोटी करदात्यांनी अद्याप त्यांचे रिटर्न दाखल केलेले नाहीत. जर तुमचाही यात समावेश असेल, तर पुढील काही दिवसांत आयटीआर दाखल करा. जर तुम्ही हे चुकवलं तर तुम्हाला अनेक प्रकारच्या दंडासह काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या

डेडलाइन चुकवली तर काय?

लेट फाइन भरावी लागेल

जर तुम्ही आयकर विभागानं दिलेल्या तारखेपर्यंत तुमचा आयटीआर दाखल केला नाही तर तुम्हाला त्यासाठी विलंब शुल्क भरावं लागेल. कलम २३४एफ अंतर्गत, जर तुमचं उत्पन्न ५ लाख किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला ५००० रुपये विलंब शुल्क भरावं लागू शकते आणि जर ते यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला १००० रुपये विलंब शुल्क भरावं लागू शकतं.

विलंब शुल्कावरील व्याज

कलम २३४अ अंतर्गत, जर तुम्ही अंतिम मुदतीनंतर आयटीआर दाखल केला तर तुम्हाला व्याज देखील द्यावं लागेल. हे व्याज दरमहा १ टक्के दरानं आकारलं जाईल. शेवटची तारीख संपताच महिन्याची मोजणी सुरू होईल.

कोणतीही सूट मिळणार नाही

निर्धारित वेळेत आयटीआर दाखल न केल्यास सूटही गमवावी लागेल. ही तरतूद आयकर कायद्याच्या कलम १३९ (१) अंतर्गत येते.

५०% पर्यंत दंड

कलम २७०ए अंतर्गत उशिरा आयटीआर दाखल केल्यास दंडाची तरतूद देखील आहे. जर तुमचं करपात्र उत्पन्न असेल तर हा दंड रिटर्न न भरल्यानं तुम्ही बचत केलेल्या बचतीच्या ५०% असेल.

Web Title: The deadline to file Income Tax Return is September 15 What will happen if you miss the date Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.