lokmat Supervote 2024
Lokmat Money >आयकर > Income Tax कसा वाचवाल? आई-वडिलांसोबत राहत असाल तरी मिळेल HRAचा लाभ

Income Tax कसा वाचवाल? आई-वडिलांसोबत राहत असाल तरी मिळेल HRAचा लाभ

How to save Income Tax? ३१ मार्च जवळ आला असताना नोकरदार वर्गाला टॅक्स कसा वाचवता येईल, या गोष्टीची चिंता वाटते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:47 PM2024-02-07T15:47:31+5:302024-02-07T15:49:00+5:30

How to save Income Tax? ३१ मार्च जवळ आला असताना नोकरदार वर्गाला टॅक्स कसा वाचवता येईल, या गोष्टीची चिंता वाटते.

How to save Income Tax? Even if you live with your parents, you will get the benefit of HRA, know more | Income Tax कसा वाचवाल? आई-वडिलांसोबत राहत असाल तरी मिळेल HRAचा लाभ

Income Tax कसा वाचवाल? आई-वडिलांसोबत राहत असाल तरी मिळेल HRAचा लाभ

How to save Income Tax? ३१ मार्च जवळ आला असताना नोकरदार वर्गाला टॅक्स कसा वाचवता येईल, या गोष्टीची चिंता वाटते. तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता, यासाठी आज तुम्हाला HRA चा एक पर्यात तुम्हाला सांगतो. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा आई-वडिलांसोबत त्यांच्या घरात राहत असाल, या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला आयकरात सूट मिळू शकते. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयकरात HRA सूट बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. 

HRA काय आहे, हे पहिले जाणून घ्या...
हाऊस रेंट अलाऊंस म्हणजेच घरभाडे भत्ता (HRA)... जो कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीकडून दिला जातो. जवळपास सर्व खाजगी व सरकारी कर्मचाऱ्यांना HRA मिळते. हा CTC चा एक भाग आहे. HRA कर सवलतीच्या कक्षेत येते आणि ज्याचे फायदे कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहेत. आयकर कायद्याच्या कलम १०(१३A) अंतर्गत HRA सूट घेता येते. त्याचा लाभ घेण्यासाठी फक्त मूळ पगार आणि महागाई भत्ता (DA) पगारात जोडला जातो. 
 
एक लाखापर्यंतच्या भाड्यासाठी पॅन कार्ड नाही लागत
तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि वर्षाला १ लाखापर्यंत भाडं देत असाल, तर तुम्हाला भाडे पावती देऊन १ लाख रुपयांपर्यंत क्लेम करू शकता. पण, जर तुमचं भाडं १ लाखापेक्षा एक रुपयाजरी अधिक असेल तर तुम्हाला कर सवलत मिळवण्यासाठी घर मालकाचे पॅन कार्ड नंबर द्यावे लागेल. सोबतच रुम अॅग्रीमेंटही द्यावं लागेल.  

जवळपास कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भाड्याच्या पावत्या जमा करण्यास सांगतात. कर्मचाऱ्याला नोकरी देणाऱ्या कंपनीकडून मिळालेला किमान HRA, किंवा महानगरांमध्ये ( दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई) राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मूळ पगाराच्या ५०% (इतर ठिकाणी ४०%) किंवा १०% वास्तविक भाड्यातील मूळ वेतन कपात केल्यानंतर, उर्वरित रकमेवर HRA म्हणून दावा केला जाऊ शकतो.

HRAचे कॅलक्युलेशन 
समजा तुमचा मूळ पगार ४० हजार रुपये प्रति महिना आहे आणि तुम्ही दिल्लीत भाड्याने राहत आहात, ज्याचे मासिक भाडे १५ हजार आहे. कंपनी तुम्हाला दरमहा सुमारे १७ हजार रुपये HRA देते. मग कर सवलती कशा मिळणार? HRA = मूळ पगाराच्या 10% वजा केल्यावर वास्तविक भाडे देय रक्कम = १५००० - ४००० = ११०००; या सूत्रानुसार HRA ११००० रुपये होईल 

पालकांच्या घरात राहताना कर बचतीचे सूत्र
तुम्ही तुमच्या पालकांच्या घरात राहात असाल तर त्यांना दरमहा भाडे देऊनही कर वाचवू शकता. त्यांनी प्रत्यक्षात भाडे द्यावे आणि आयकर विभागाला कळवावे, अशी अट आहे. भरलेले भाडे वार्षिक १ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, आयकर सवलत मिळविण्यासाठी, पालकांचा पॅन क्रमांक फॉर्ममध्ये भरावा लागेल. याशिवाय भाडे करारही करावा लागणार आहे.   

Web Title: How to save Income Tax? Even if you live with your parents, you will get the benefit of HRA, know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.