Lokmat Money >आयकर > Pan Card Number : कसा ठरवला जातो पॅन कार्डाचा नंबर, प्रत्येक अक्षरामागे असतो एक अर्थ; जाणून घ्या रंजक माहिती

Pan Card Number : कसा ठरवला जातो पॅन कार्डाचा नंबर, प्रत्येक अक्षरामागे असतो एक अर्थ; जाणून घ्या रंजक माहिती

Pan Card Numbers Information : पॅन कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर १० अंकी एक नंबर पाहिला असेल. त्यावर सर्व प्रकारची माहिती असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 11:16 IST2024-12-30T11:16:17+5:302024-12-30T11:16:17+5:30

Pan Card Numbers Information : पॅन कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर १० अंकी एक नंबर पाहिला असेल. त्यावर सर्व प्रकारची माहिती असते.

How is the PAN card number determined each letter has a meaning know interesting information important document | Pan Card Number : कसा ठरवला जातो पॅन कार्डाचा नंबर, प्रत्येक अक्षरामागे असतो एक अर्थ; जाणून घ्या रंजक माहिती

Pan Card Number : कसा ठरवला जातो पॅन कार्डाचा नंबर, प्रत्येक अक्षरामागे असतो एक अर्थ; जाणून घ्या रंजक माहिती

पॅन कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर १० अंकी एक नंबर पाहिला असेल. त्यावर सर्व प्रकारची माहिती असते. या अंकांमधील माहिती आयकर विभाग ट्रॅक करत असते. हे लक्षात घेऊन विभाग प्रत्येक व्यक्तीला पॅन कार्ड जारी करतो. मात्र, पॅन कार्डवर लिहिलेले क्रमांक समजणारे किंवा ओळखणारे फार कमी लोक आहेत. आम्ही तुम्हाला पॅन कार्डवर लिहिलेल्या अल्फान्यूमेरिक नंबरचा अर्थ काय असतो ते सांगत आहोत.

पॅन कार्डावर कार्डधारकाचं नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असते. परंतु पॅन कार्डच्या नंबरमध्ये तुमचं आडनावही असतं. पॅन कार्डाचं पाचवं डिजिट तुमचं आडनाव दर्शवतं. इन्कम टॅक विभाग कार्डधारकाच्या आडनावालाच आपल्या डेटामध्ये नोंद करून ठेवतं. यासाठीच अकाऊंट नंबरपमध्ये त्याची माहिती असते. याची माहिती टॅक्स डिपार्टमेंट कार्डधारकाला देत नाही.

१० अंकी विशेष क्रमांक

पॅन कार्ड क्रमांक हा १० अंकी खास क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येतो. जे लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना आयकर विभाग ते जारी करतो. पॅनकार्ड बनल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅनकार्डशी लिंक केले जातात. यामध्ये कर भरणा, क्रेडिट कार्डद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे सर्व विभागाच्या देखरेखीखाली होते. या नंबरच्या सुरुवातीचे तीन डिजीट इंग्रजी अक्षरं असतात. हे AAA पासून ZZZ पर्यंत कोणतेही असू शकतात. सध्या सुरु असलेल्या सीरिजनुसार ते ठरवले जातात. विभाग आपल्या प्रमाणे ते ठरवत असतं. पॅन नंबरचं चौथं डिजीटही एक अक्षर असतं. परंतु ते कार्डधारकाचं स्टेटस सांगतं.

यामध्ये चौथं डिजीट पुढील पैकी काहीही असू शकतं. P - सिंगल पर्सन, F - फर्म, C - कंपनी, A - एसोसिएशन ऑफ पर्सन, T - ट्रस्ट, H - हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली, B - बॉडी ऑफ इंडिविज्युअल, L - लोकल, J - आर्टिफिशिअल ज्युडिशिअल पर्सन, G - सरकारसाठी. पॅन कार्डाच्या पाचव्या डिजीट म्हणजे इंग्रजी अक्षरच असतं. ते तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर असतं. यानंतर पॅन कार्डात चार क्रमांक असतात. ते ०००१ पासून ९९९९ पर्यंत कोणतेही असू शकतात.

पॅन क्रमांक बदलता येत नाही

तुमच्या पॅन कार्डाचे नंबर्स सीरिज दर्शवतात. याचं अखेरचं डिजीट एक अल्फाबेट असतं, जे कोणतंही लेटर असू शकतं. दरम्यान, आर्थिक व्यवहारासांठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पत्ता बदलला तरी पॅन कार्डाचा क्रमांक बदलत नाही. पॅन कार्ड हे एका आयडीच्या स्वरूपातही वापरू शकता.

Web Title: How is the PAN card number determined each letter has a meaning know interesting information important document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.