Lokmat Money >आयकर > सरकारची तिजोरी भरली; ऑगस्टमध्ये तब्बल ₹१.८६ लाख कोटींचे GST कलेक्शन

सरकारची तिजोरी भरली; ऑगस्टमध्ये तब्बल ₹१.८६ लाख कोटींचे GST कलेक्शन

GST Collection : केंद्र सरकारने आज GST संकलनाचे आकडे शेअर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:06 IST2025-09-01T18:05:02+5:302025-09-01T18:06:02+5:30

GST Collection : केंद्र सरकारने आज GST संकलनाचे आकडे शेअर केले आहेत.

GST collection of ₹1.86 lakh crore in August 2025 | सरकारची तिजोरी भरली; ऑगस्टमध्ये तब्बल ₹१.८६ लाख कोटींचे GST कलेक्शन

सरकारची तिजोरी भरली; ऑगस्टमध्ये तब्बल ₹१.८६ लाख कोटींचे GST कलेक्शन

GST Collection : केंद्र सरकारने सोमवारी GST संकलनाचे आकडे शेअर केले आहेत. आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात १.८६ लाख कोटी रुपयांचे संकलन झाले, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ६.५ टक्के जास्त आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये १.७५ लाख कोटींचे संकलन झाले होते. तर, मागील महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, जुलै २०२५ मध्ये जीएसटी संकलनातून १.९६ लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले.

सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, देशांतर्गत महसुलात झालेल्या वाढीमुळे ऑगस्टमध्ये एकूण जीएसटी संकलन १.८६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. गेल्या महिन्यात हा महसूल ९.६ टक्क्यांनी वाढून १.३७ लाख कोटी रुपये झाला, तर आयात कर १.२ टक्क्यांनी घसरून ४९,३५४ कोटी रुपये झाला. जर आपण जीएसटी परतफेडीकडे पाहिले तर, तो २० टक्क्यांनी घसरून १९,३५९ कोटी रुपयांवर आला.

एप्रिल २०२५ मध्ये रेकॉर्ड कलेक्शन
आपण आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जीएसटी कलेक्शनच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, या वर्षी एप्रिल महिन्यात सरकारने जीएसटी कलेक्शनमधून २.३७ लाख कोटी रुपये कमावले. जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक कलेक्शन होता. दरम्यान, जीएसटी कौन्सिलची बैठक दोन दिवसांनी होत आहे. यामध्ये जीएसटी सुधारणा अंतर्गत कर स्लॅबची संख्या कमी करणे आणि जीएसटी दर तर्कसंगत करण्यावर चर्चा होणार आहे.

देशात जीएसटीमध्ये बदल करण्याची तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून जीएसटी सुधारणांची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, सरकार पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणा आणत आहे आणि यामुळे सामान्य माणसावरील कराचा भार कमी होईल. त्यांनी आशा व्यक्त केली होती की, दिवाळीपूर्वी नवीन सुधारमा लागू होतील. 

Web Title: GST collection of ₹1.86 lakh crore in August 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.