Lokmat Money >आयकर > कामासाठी फॉरेनला, तरी भरावा लागेल आयकर?

कामासाठी फॉरेनला, तरी भरावा लागेल आयकर?

लवादाच्या निर्णयामुळे निर्माण झाला पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 06:01 AM2024-02-17T06:01:18+5:302024-02-17T06:01:39+5:30

लवादाच्या निर्णयामुळे निर्माण झाला पेच

Foreigners have to pay income tax for work? | कामासाठी फॉरेनला, तरी भरावा लागेल आयकर?

कामासाठी फॉरेनला, तरी भरावा लागेल आयकर?

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी विदेशात पाठवतात तेव्हा त्यांना निवास भत्ता (लिव्हिंग अलाउन्स) देतात. यासाठी कर्मचाऱ्यांना काही दिवसांसाठी किंवा दीर्घ काळासाठी विदेशात राहावे लागते. यावर खर्च होणाऱ्या निवास भत्त्यावर भारतात आयकर लागेल का, असा प्रश्न आयकर अपील लवादाच्या एका निर्णयामुळे निर्माण झाला आहे. आयकर अपील लवादाच्या दिल्ली शाखेने ऑस्ट्रियात राहणाऱ्या एका अनिवासी भारतीयाच्या प्रकरणी हा निर्णय दिला आहे.

या प्रकरणात सामील एनआरआय व्यक्तीस वेतन व निवास भत्ता कंपनीकडून भारतात दिला जात होता. त्याला निवास भत्त्यावर आयकर भरण्याची गरज नाही, असा निर्णय लवादाने दिला आहे. हाच निर्णय भारतात राहणाऱ्या; पण विदेशात कार्यालयीन काम करणाऱ्या व्यक्तीलाही लागू होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

काय सांगतात जाणकार?
nकर सल्लागार संस्था ‘टॅक्सबिरबल’चे संचालक चेतन चांडक यांनी सांगितले की, तुम्ही निवासी भारतीय असाल, तर विदेशात होणाऱ्या उत्पन्नावर तुम्हाला भारतात कर भरावा लागेल. विदेशातील उत्पन्नावर त्या देशात तुम्ही आधीच कर भरला असेल, तर त्यासाठी तुम्ही टॅक्स क्रेडिट मागू शकता.
nतुम्ही ‘रेसिडेंट बट नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट’ श्रेणीतील नागरिक असाल, तर विदेशातील उत्पन्न भारतात कराच्या कक्षेत येणार नाही. वेतन हे जेथे काम केले जाते. 

Web Title: Foreigners have to pay income tax for work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.