Lokmat Money > बिझनेस न्यूज > IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

आता शस्त्रसंधीनंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आयपीएलचे सामने कधी होणार, अंतिम सामन्याची तारीख काय आहे, आयपीएलच्या एका सामन्यातून बीसीसीआयला किती कमाई होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 13:03 IST2025-05-13T12:59:23+5:302025-05-13T13:03:33+5:30

आता शस्त्रसंधीनंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आयपीएलचे सामने कधी होणार, अंतिम सामन्याची तारीख काय आहे, आयपीएलच्या एका सामन्यातून बीसीसीआयला किती कमाई होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

How much does BCCI earn from IPL 2025 matches what are the sources of income where does the money come from | IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आयपीएल २०२५ चं नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल मध्येच थांबवण्यात आली होती. पण आता शस्त्रसंधीनंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आयपीएलचे सामने कधी होणार, अंतिम सामन्याची तारीख काय आहे, आयपीएलच्या एका सामन्यातून बीसीसीआयला किती कमाई होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयपीएल २०२५ चं नवं वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने १७ मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. उर्वरित १२ साखळी सामने आणि ४ प्लेऑफ सामने ६ शहरांमध्ये खेळवले जातील. यामध्ये बंगळुरू, चेन्नई, जयपूर, लखनौ, मुंबई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. याशिवाय आयपीएल २०२५ फायनल मॅचची तारीख ३ जून २०२५ ठेवण्यात आलेली आहे आणि हा सामना कोलकात्यात खेळवला जाईल. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलचे सामने एक आठवडा पुढे ढकलण्यात आले होते.

अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी

आयपीएलमधून किती उत्पन्न मिळतं?

इंडियन प्रीमियर लीगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत म्हणजे मीडिया राइट्स, स्पॉन्सरशिप, फ्रँचायझी फी आणि तिकीट विक्री इत्यादी. २०२३-२७ साठी आयपीएलचे मीडिया राइट्स ४८,३९० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. डिस्ने स्टारकडे २३,५७५ कोटी रुपयांचे टेलिव्हिजन राइट्स आहेत. जिओ सिनेमाकडे २३,७५८ कोटी रुपयांचे डिजिटल हक्क आहेत. मात्र, आता या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झालंय. बीसीसीआयच्या योजनेनुसार २०२३ ते २०२७ या कालावधीत एकूण ४१० सामन्यांचे नियोजन करण्यात आलंय.

मीडिया राइट्समधून बीसीसीआयला प्रत्येक सामन्यातून अंदाजे सरासरी ११८ कोटी रुपये मिळतात. याशिवाय टाटा सन्ससारख्या बड्या प्रायोजकांकडून २,५०० कोटी रुपये टायटल राइट्स आणि इतर प्रायोजकांकडून १,४८५ कोटी रुपये आणि तिकीट विक्रीतून ही कमाई केली जाते.

२०२३ मध्ये बीसीसीआयला आयपीएलमधून एकूण ११,७६९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यामध्ये ५१२० कोटी रुपयांचा सरप्लस होता. एका अंदाजानुसार, बीसीसीआयला प्रत्येक सामन्यातून मीडिया हक्क आणि प्रायोजक तिकिटांसारख्या इतर स्त्रोतांच्या माध्यमातून सुमारे १५० ते २०० कोटी रुपये मिळतात. प्रेक्षकांची संख्या, जाहिरातींचे दर, स्टेडियमची क्षमता अशा अनेक घटकांवर सामन्यातून मिळणारा हा महसूल अवलंबून असतो.

८ मे २०२५ रोजी धरमशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना भारत-पाकिस्तान तणावामुळे मध्येच रद्द करावा लागला होता. यानंतर आयपीएल २०२५ चे सर्व सामने एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले. पण आता शस्त्रसंधीनंतर आयपीएलचे सामने पुन्हा सुरू होणार आहेत.

Web Title: How much does BCCI earn from IPL 2025 matches what are the sources of income where does the money come from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.