homemakers entrepreneurship report 2021 : ... म्हणून 62 टक्के गृहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक; जाणून घ्या काय म्हणतो सर्वेक्षण अहवाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:45 PM2021-09-16T14:45:10+5:302021-09-16T14:45:50+5:30

homemakers entrepreneurship report 2021 : हा अहवाल एका सर्वेक्षणाच्या आधारावर तयार करण्यात आला आहे, ज्यात देशातील 13 वेगवेगळ्या शहरांमधील 1,818 गृहिणींचा समावेश करण्यात आला.

homemakers entrepreneurship report 2021 : 62 percent homemakers aspire to start business of their own | homemakers entrepreneurship report 2021 : ... म्हणून 62 टक्के गृहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक; जाणून घ्या काय म्हणतो सर्वेक्षण अहवाल?

homemakers entrepreneurship report 2021 : ... म्हणून 62 टक्के गृहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक; जाणून घ्या काय म्हणतो सर्वेक्षण अहवाल?

Next

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची इच्छा आणि कुटुंबाला आर्थिक योगदान देण्याच्या क्षमतेमुळे बहुतेक गृहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. अशा गृहिणींची संख्या जवळपास 62 टक्के आहे, यासंदर्भातील माहिती भारतीय गृहिणी उद्योजकता अहवाल 2021  (Indian Homemakers Entrepreneurship Report 2021) मधून समोर आली आहे. (homemakers entrepreneurship report 2021 : 62 percent homemakers aspire to start business of their own)

अहवालानुसार, 81 टक्के गृहिणी म्हणतात की, जर त्यांचा स्वतःचा व्यवसाय असेल तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. 78 टक्के गृहिणींना यामुळे सशक्त वाटेल, तर 63 टक्के गृहिणींनी म्हटले की, यामुळे त्यांना समाजात अधिक सन्मान मिळेल. हा अहवाल एका सर्वेक्षणाच्या आधारावर तयार करण्यात आला आहे, ज्यात देशातील 13 वेगवेगळ्या शहरांमधील 1,818 गृहिणींचा समावेश करण्यात आला.


याचबरोबर, अहवालात असे म्हटले आहे की, 73 टक्के गृहिणींना घरगुती जबाबदाऱ्यांमुळे वेळ मिळत नाही आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत, तर 53 टक्के मार्गदर्शनाच्या अभावामुळे आणि 50 टक्के गृहिणी वित्तपुरवठ्याअभावी सुरू करू शकत नाहीत. तसेच, गृहिणींचे काही लोकप्रिय व्यवसाय चालू आहेत, जे बुटीक (16 टक्के), होम ट्यूशन (10 टक्के), दागिने (7 टक्के), ब्यूटी पार्लर आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, भारतीय गृहिणी उद्योजकता अहवाल 2021 प्रमुख खाद्य कंपनी ब्रिटानियाद्वारे समर्थित आहे आणि अभ्यास करण्यासाठी गृहिणींमध्ये देशव्यापी सर्वेक्षणावर आधारित आहे. 

Google च्या सिनिअर मार्केटिंग डायरेक्टर (भारत आणि दक्षिण पूर्व आशिया) सपना चड्ढा म्हणाल्या, Google मध्ये आम्ही जे काही करतो, ते संधी आणि समावेशकतेच्या मुळाशी असते. आमची उत्पादने आणि कार्यक्रमांद्वारे, आम्ही भारतातील लाखो महिलांना उत्पन्न मिळवण्यासाठी डिजिटल साधनांचा लाभ घेण्यासाठी पाठिंबा दिला आहे. तसेच, डिजिटलच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेच्या संधी स्वीकारण्यास मदत केल्याने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये, समुदायात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत सकारात्मक फरक पडला आहे, असे सपना चड्ढा यांनी सांगितले.

Web Title: homemakers entrepreneurship report 2021 : 62 percent homemakers aspire to start business of their own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app