lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम

GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम

GST Council meeting latest news: वस्तू आणि सेवा कर परिषदेची (GST Council) आज नवी दिल्लीत ४४ वी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 04:19 PM2021-06-12T16:19:28+5:302021-06-12T16:19:59+5:30

GST Council meeting latest news: वस्तू आणि सेवा कर परिषदेची (GST Council) आज नवी दिल्लीत ४४ वी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

GST Council Meet Drugs on Black Fungus Tax Free 5 percent GST on corona vaccine | GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम

GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम

GST Council meeting latest news: वस्तू आणि सेवा कर परिषदेची (GST Council) आज नवी दिल्लीत ४४ वी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यात म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय कोरोना संबंधीच्या उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. (GST Council Meet Drugs on Black Fungus Tax Free 5 percent GST on corona vaccine)

दरम्यान, कोरोना लसीवर ५ टक्के जीएसटी यापुढेही कायम राहणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. आज बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अधिसुचना उद्या जारी केली जाईल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच जीएसटीचं आज जारी करण्यात आलेले दर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत. 

कोरोना लसीवर GST कायम
कोरोना लसीवरील जीएसटी माफ करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. पण जीएसटी परिषदेनं लसीवरील जीएसटी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीवर ५ टक्के जीएसटी लागू राहणार आहे. 

रेमडेसिवीरही होणार स्वस्त
कोरोना रुग्णावर उपचारासाठी महत्वाचं ठरत असलेल्या रेमडेसिवीरवरील जीएसटीमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटी आता ५ टक्के इतका करण्यात आला आहे. याआधी रेमडेसिवीरवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. 
 

Read in English

Web Title: GST Council Meet Drugs on Black Fungus Tax Free 5 percent GST on corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.