Gold Price 14th May: अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध आणि भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी आली आणि लोकांनी जोखीम घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाली. आज म्हणजेच बुधवार १४ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ५६८ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९३७७६ रुपयांवर उघडलं. तर, चांदीचा भाव ८७१ रुपयांनी घसरून ९५९४९ रुपये प्रति किलोवर उघडला.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून सराफा बाजाराचे दर जारी करण्यात आले आहेत, यामध्ये GST चा समावेश नाही. तुमच्या शहरात यामुळे १००० ते २००० रुपयांचा फरक पडण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरी संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
GST सोबत दर काय?
जीएसटीसह आज सोन्याचे दर ९६,५८९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९८,८२७ रुपये प्रति किलो झाले आहेत. यंदा सोनं सुमारे १८,०३६ रुपयांनी तर चांदी ९९३२ रुपयांनी महागली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.
आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंही आज ५६५ रुपयांनी स्वस्त झाले आणि ते ९३,४०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ४२० रुपयांनी घसरला आणि ८५,८९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. १८ कॅरेट सोन्याची किंमतही स्वस्त झाली आहे आणि ती प्रति १० ग्रॅम ७०,३३२ रुपयांवर आली. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ३३२ रुपयांनी घसरून ५४८५९ रुपयांवर आली आहे.