Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

Gold Silver Rates Today : आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

By जयदीप दाभोळकर | Updated: June 27, 2025 15:36 IST2025-06-27T15:35:45+5:302025-06-27T15:36:56+5:30

Gold Silver Rates Today : आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold and silver prices 27 june 2025 fell sharply today the price of 10 grams of gold has become this much | Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

Gold Silver Rates Today : आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होत आहे. सोनं सतत स्वस्त होत असून ते प्रति १० ग्रॅम १०२४ रुपयांनी घसरून ९६१३५ रुपयांवर आलं. चांदीच्या किमतीत ३५० रुपयांची घट झाली आहे आणि ती प्रति किलो १०६८०० रुपयांवर आली. जीएसटीमुळे सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १००००० रुपयांच्या खाली गेली आहे. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ९९०१९ रुपये दरानं विकलं जात आहे, तर चांदी ११०००४ रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.

१८ कॅरेटचा दर काय?

आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव १०२० रुपयांनी घसरून ९५,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ९३८ रुपयांनी घसरून ८८,०६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ही ७६८ रुपयांनी कमी होऊन ७२,१०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव ६६,९९६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात जीएसटी आणि मेकिंग चार्जचा समावेश नाही. 

एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सोन्या-चांदीचे स्पॉट दर जाहीर केले आहेत. त्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

Web Title: Gold and silver prices 27 june 2025 fell sharply today the price of 10 grams of gold has become this much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.