PM Shram Yogi Man Dhan Yojana : फक्त 2 रुपयांची बचत तुम्हाला देऊ शकते 36,000 रुपये, केंद्र सरकारची खास योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 02:19 PM2021-10-16T14:19:55+5:302021-10-16T14:21:26+5:30

PM Shram Yogi Man Dhan Yojana : ही योजना रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांसाठी आहे.

get 36000 rupees a saving of just rs 2 under pm shram yogi man dhan yojna check how details here | PM Shram Yogi Man Dhan Yojana : फक्त 2 रुपयांची बचत तुम्हाला देऊ शकते 36,000 रुपये, केंद्र सरकारची खास योजना

PM Shram Yogi Man Dhan Yojana : फक्त 2 रुपयांची बचत तुम्हाला देऊ शकते 36,000 रुपये, केंद्र सरकारची खास योजना

Next

नवी दिल्ली :  जर तुम्ही गुंतवणुकीचे नियोजन (Investment planning) करत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही फक्त दररोज दोन रुपयांची बचत केली तर तुम्हाला जवळपास 36,000 रुपयांचा लाभ मिळेल. दरम्यान, केंद्र सरकारने  (Modi govt investment scheme)असंघटित क्षेत्राशी संबंधित कामगार, मजूर, कामगार इत्यादींसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan Yojana) असे आहे. 

ही योजना रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांसाठी आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला पेन्शनची हमी देते. या योजनेत प्रतिदिन 2 रुपयांची बचत करून तुम्ही 36,000 रुपये वार्षिक पेन्शन (Pension scheme)मिळवू शकता.

दरमहा जमा करावे लागतील 55 रुपये
जर एखाद्या व्यक्तीने ही योजना वयाच्या 18 वर्षांपासून सुरू केली तर त्या व्यक्तीला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, दिवसाला 2 रुपयांची बचत करून आणि महिन्यासाठी 55 रुपये जमा करून तुम्ही 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. त्याचबरोबर, ज्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली आहे, त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. जमा करणाऱ्या व्यक्तीला वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. 60 वर्षांनंतर,  दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल म्हणजेच 36000 रुपये दर वर्षाला मिळतील.

आवश्यक कागदपत्रे...
अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर आवश्यक असेल. याशिवाय, संमतीपत्र द्यावे लागेल, ज्या बँकेत खाते आहे, तेथील बँक शाखेत हे द्यावे लागेल. तरच पेन्शनसाठी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील.

जाणून घ्या कोठे होईल रजिस्ट्रेशन?
कामगारांना या योजनेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC)नोंदणी करावी लागेल. भारत सरकारने या योजनेसाठी एक वेब पोर्टल तयार केले आहे. कामगार सीएससी केंद्रातील पोर्टलवर नोंदणी करू शकतील. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

टोल फ्री नंबरवर मिळेल माहिती
या योजनेसाठी कामगार विभाग, LIC, EPFO ​​च्या कार्यालयाला सरकारने श्रमिक सुविधा केंद्र केले आहे. या कार्यालयांना भेट देऊन कामगारांना योजनेची माहिती मिळू शकते. सरकारने या योजनेसाठी 18002676888 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावरून योजनेची माहितीही घेता येईल.

Web Title: get 36000 rupees a saving of just rs 2 under pm shram yogi man dhan yojna check how details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app