Forbes India Rich List 2019: Mukesh Ambani once again richest, gautam adani second | Forbes India Rich List 2019: पुन्हा एकदा मुकेश अंबानी ठरले सर्वाधिक श्रीमंत, दुसऱ्या स्थानावर अदानी
Forbes India Rich List 2019: पुन्हा एकदा मुकेश अंबानी ठरले सर्वाधिक श्रीमंत, दुसऱ्या स्थानावर अदानी

नवी दिल्लीः रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष मुकेश अंबानींनी सर्वात श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा पहिला नंबर मिळवला आहे. फोर्ब्स इंडिया मॅगझिननं 2019मधल्या श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 51.4 अब्ज डॉलरची संपत्तीसह मुकेश अंबानी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. उद्योगपती असलेल्या गौतम अदानींनी यंदा दुसरा क्रमांक पटकावला आहे. गौतम अदानींची एकूण संपत्ती 15.7 अब्ज डॉलर आहे.

अदानी यांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. कारण त्यांनी 8व्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. फोर्ब्स इंडिया मॅगझिननुसार, एअरपोर्टपासून डेटा सेंटरपर्यंत प्रत्येक व्यवसायामध्ये केलेल्या प्रयोगामुळेच ते यशस्वी झाले आहे. या यादीत 100 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे.  
अजीम प्रेमजी 17व्या स्थानावर
फोर्ब्सनुसार, 14 श्रीमंतांच्या संपत्तीत 1 अब्ज डॉलरची घट आलेली आहे. गेल्या वर्षी या यादीत 9 अब्जोपती या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. उद्योगपती अजीम प्रेमजींच्या संपत्तीतही घट झाली असून, मार्चमध्ये त्यांच्या संपत्तीत घसरण आली आहे.  त्यांनी मार्चमध्ये संपत्तीचा मोठा भाग दान केलेला आहे. त्यामुळेच या यादीत ते दुसऱ्या स्थानावरून 17व्या स्थानावर गेले आहेत.  
 


Web Title: Forbes India Rich List 2019: Mukesh Ambani once again richest, gautam adani second
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.