Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्लिपकार्टचे संस्थापक बन्सल यांनी भरला ६९९ कोटींचा कर

फ्लिपकार्टचे संस्थापक बन्सल यांनी भरला ६९९ कोटींचा कर

फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी ६९९ कोटींचा कर भरला आहे. कंपनीचे समभाग विकून मिळालेल्या भांडवली उत्पन्नावरील कराचाही यात समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:21 AM2019-01-03T01:21:38+5:302019-01-03T01:21:59+5:30

फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी ६९९ कोटींचा कर भरला आहे. कंपनीचे समभाग विकून मिळालेल्या भांडवली उत्पन्नावरील कराचाही यात समावेश आहे.

 Flipkart founder Bansal paid a whopping Rs.699 crore | फ्लिपकार्टचे संस्थापक बन्सल यांनी भरला ६९९ कोटींचा कर

फ्लिपकार्टचे संस्थापक बन्सल यांनी भरला ६९९ कोटींचा कर

नवी दिल्ली : फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी ६९९ कोटींचा कर भरला आहे. कंपनीचे समभाग विकून मिळालेल्या भांडवली उत्पन्नावरील कराचाही यात समावेश आहे. सचिनचे भागीदार बिन्नी बन्सल यांनी आपल्या भांडवली उत्पन्नाची माहिती प्राप्तिकर विभागाला अद्याप दिलेली नाही.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी दोघांनीही फ्लिपकार्टमधील समभाग विकले होते. नंतर प्राप्तिकर विभागाने त्यांना नोटिसा बजावत यातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती मागितली. त्यानंतर सचिन यांनी ६९९ कोटींचा कर भरला. फ्लिपकार्टचे समभाग विकत घेणाऱ्या वॉलमार्टलाही अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची नोटीस प्राप्तिकर विभागाने बजावली होती. वॉलमार्टने ४६ समभागधारकांकडून फ्लिपकार्टचे ७७ टक्के समभाग १६ अब्ज डॉलर्सना विकत घेतले. नोटिशीनंतर वॉलमार्टने ७,४४० कोटींचा कर भरल्याचे समजते.

Web Title:  Flipkart founder Bansal paid a whopping Rs.699 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.