Lokmat Money > बिझनेस न्यूज > विकास असावा तर असा! मासेमारी करणाऱ्यांचं गाव बनलं सिलिकॉन सिटी, आनंद महिंद्रा म्हणाले...

विकास असावा तर असा! मासेमारी करणाऱ्यांचं गाव बनलं सिलिकॉन सिटी, आनंद महिंद्रा म्हणाले...

Shenzhen City Success Story: भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून आता तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं लक्ष्य आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक उद्योजकानं वेगवेगळे युक्तिवाद केले. मात्र, भारतात शेन्झेनसारख्या शहरांची गरज असल्याचं आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं.

By जयदीप दाभोळकर | Updated: April 12, 2025 13:49 IST2025-04-12T13:45:49+5:302025-04-12T13:49:24+5:30

Shenzhen City Success Story: भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून आता तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं लक्ष्य आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक उद्योजकानं वेगवेगळे युक्तिवाद केले. मात्र, भारतात शेन्झेनसारख्या शहरांची गरज असल्याचं आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं.

fishing village china Shenzhen has become a Silicon City know what mahindra and mahindra Anand Mahindra said | विकास असावा तर असा! मासेमारी करणाऱ्यांचं गाव बनलं सिलिकॉन सिटी, आनंद महिंद्रा म्हणाले...

विकास असावा तर असा! मासेमारी करणाऱ्यांचं गाव बनलं सिलिकॉन सिटी, आनंद महिंद्रा म्हणाले...

Shenzhen City Success Story: भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून आता तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं लक्ष्य आहे. त्यासाठी सरकारपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वजण प्रयत्नशील आहेत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक उद्योजकानं वेगवेगळे युक्तिवाद केले. काहींनी आठवड्यातून ७० तास काम करण्याची गरज सांगितली, तर काहींनी ९० तास काम करण्याचा आग्रह धरला. मात्र, दुसरीकडे भारतात शेन्झेनसारख्या शहरांची गरज असल्याचं मत महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं.

"It’s time for a Shenzhen equivalent city in India..." म्हणजेच शेन्झेनसारखे शहर भारतातही उभारण्याची वेळ आली आहे, असं आनंद महिंद्रांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं. कदाचित देशातील कोट्यवधी लोकांना या शहराची माहिती नसेल. खरं तर आज जगात सिलिकॉन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर एकेकाळी मासेमारी व्यवसायासाठी ओळखलं जात होतं. मात्र, सरकारच्या धोरणांमुळे त्याचं रूपांतर तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचं जागतिक केंद्र म्हणून झालं. एका गावातून सिलिकॉन सिटी बनलेल्या या शहराची गोष्ट जाणून घेऊ.

बँकांनी व्याजदर कमी केल्यानंतर FD पेक्षा बेस्ट ठरतेय पोस्टाची 'ही' स्कीम, मिळतंय अधिक व्याज

शेन्झेन जगाच्या नकाशावर कुठे आहे?

शेन्झेन हे चीनमधील एक अतिशय रंजक शहर आहे, जे केवळ काही दशकांमध्ये मासेमारीच्या गावापासून तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेचं जागतिक केंद्र बनलंय. या शहराला चीनची सिलिकॉन व्हॅली म्हणतात. हार्डवेअर डेव्हलपमेंटसाठी या शहरात जगातील सर्वात वेगवान आणि सर्वोत्तम इकोसिस्टम आहे. इतकंच नाही तर शेन्झेन हे जगातील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणूनही ओळखलं जातं. मोबाइल, लॅपटॉप, ड्रोनपासून अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स येथे तयार केली जातात.

गाव ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब कसं बनलं?

४५ वर्षांपूर्वी शेन्झेनची ओळख मासेमारी चे गाव म्हणून होती. मात्र, १९८० मध्ये येथे चीनचा पहिला 'स्पेशल इकॉनॉमिक झोन' तयार करण्यात आला. त्यानंतर येथे झपाट्यानं उद्योग व कारखाने उभारले गेले. हळूहळू ४५ वर्षांच्या या प्रवासात शेन्झेननं जगात आपला ठसा उमटवला. शेन्झेन हाँगकाँगच्या अगदी जवळ आहे, ज्यामुळे त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक मजबूत होते.

वनप्लस आणि हुवावेसह चिनी टेक दिग्गजांचे मुख्यालयं शेन्झेन मध्ये आहेत. एकेकाळी खेडेगाव असलेले शेन्झेन आज चीनमधील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. शेन्झेनची गोष्ट जाणून घेतल्यानंतर प्रत्येक भारतीय आनंद महिंद्रा यांच्याशी सहमत होईल की, आपणही दिल्ली-मुंबई आणि मोठी शहरे सोडून छोट्या गावांचा औद्योगिक केंद्र म्हणून विकास केला पाहिजे.

Web Title: fishing village china Shenzhen has become a Silicon City know what mahindra and mahindra Anand Mahindra said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.