Etihad Airways is eager for Jet's participation in the airline | एअरलाइन्सवर जेटमधील भागीदारीसाठी एतिहाद एअरवेज उत्सुक

एअरलाइन्सवर जेटमधील भागीदारीसाठी एतिहाद एअरवेज उत्सुक

अबुधाबी / मुंबई : बंद पडलेल्या जेट एअरलाइन्ससाठी आशेचा किरण दिसून येत आहे. सहयोगी कंपनी एतिहाद एअरवेजने भागीदारी खरेदीसाठी निविदा जमा केली आहे. जेटमध्ये २४ टक्के भागीदारी असलेल्या एतिहादच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, भारताच्या जेट एअरवेजमध्ये काही अटींवर पुन्हा गुंतवणूक करण्याचा विचार सुरू आहे. परिवहन क्षेत्रात भारत जगात वेगाने वाढत आहे. यूएईचा आर्थिक सहकारी देश म्हणूनही भारताकडे पाहिले जाते.
एतिहाद एअरवेजच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही एअरवेजचे मुख्य गुंतवणूकदार बनू इच्छित नाहीत. याशिवायही गुंतवणूकदारांना पुढे यावे लागेल. यात फेरभांडवलीकरण व्हायला हवे. एतिहादशिवाय नॅशनल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ), टीपीजी कॅपिटल आणि इंडिगो यांनाही गुंतवणुकीबाबत अपेक्षा आहेत.
एतिहादने हे स्पष्ट केले नाही की, जेट एअरवेजमध्ये जर एखाद्या कंपनीने अधिक भागीदारी खरेदी केली, तर त्यांच्यासोबत ते काम करतील का? इंडिगो आणि स्पाईसजेटसोबत स्पर्धा करणाऱ्या आणि भारतातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असणाºया जेटची आर्थिक स्थिती अलीकडच्या काळात अधिक बिघडत गेली.
एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले की, एअरलाइन्सला सध्या ‘दिवाळखोर प्रक्रियेंतर्गत’ आणण्याचा कोणताही विचार नाही. दरम्यान, जेटने अलीकडच्या काळात एतिहादसह अन्य कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आवाहन करताना विशेष प्रयत्नही केले होते; पण बहुतांश गुंतवणूकदारांची ही अट होती की, जेटचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नरेश गोयल यांना हटवायला हवे. २६ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत जेटने १२० पेक्षा अधिक विमानांच्या साहाय्याने ६०० पेक्षा अधिक दररोजची उड्डाणे केलेली आहेत. देशातील बॉलीवूड कलाकार, राजकीय व्यक्ती, व्यावसायिक यांची प्रवासासाठी जेट ही पसंत राहिलेली आहे.

८००० कोटी रुपयांचे कर्ज
जेट एअरवेजची उड्डाणे १७ एप्रिलपासून बंद आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वातील २६ कर्जदार बँकांच्या समितीने ८ ते १२ एप्रिलदरम्यान जेट एअरवेजसाठी ईओआय (रुची पत्र) आमंत्रित केले होते. कर्जदारांच्या समितीने एअरलाइन्सची ३१.२ टक्के ते ७५ टक्के भागीदारी विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या एअरलाइन्सवर ८००० कोटी रुपयांचे कर्ज आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Etihad Airways is eager for Jet's participation in the airline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.