Paytm Offer: सणासुदीच्या काळात Paytm ची कॅशबॅक ऑफर, 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:16 PM2021-10-18T18:16:44+5:302021-10-18T18:17:04+5:30

Paytm Offer: कंपनीने 'पेटीएम कॅशबॅक धमाका' भारतातील सर्व जिल्ह्यांमधील ग्राहकांसाठी एक मार्केटिंग मोहीम म्हणून सुरू केली आहे.

Earn Money Great Cashback Offer From Paytm This Festive Season Chance To Win Up To Rs 1 Lakh | Paytm Offer: सणासुदीच्या काळात Paytm ची कॅशबॅक ऑफर, 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

Paytm Offer: सणासुदीच्या काळात Paytm ची कॅशबॅक ऑफर, 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

Next

नवी दिल्लीः जर तुम्ही पेटीएमचा (Paytm) वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. दरम्यान, डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा फर्म पेटीएमने सणासुदीच्या काळात मार्केटिंग मोहिमेसाठी 100 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. यासंदर्भात पेटीएमने सोमवारी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना कॅशबॅक देणार आहे. याचबरोबर, कंपनी यूपीआय आणि 'बाय नाउ, पे लेटर'च्या प्रचारासाठी मोहीम राबवेल. (Earn Money Great Cashback Offer From Paytm This Festive Season Chance To Win Up To Rs 1 Lakh)

कंपनीने 'पेटीएम कॅशबॅक धमाका' भारतातील सर्व जिल्ह्यांमधील ग्राहकांसाठी एक मार्केटिंग मोहीम म्हणून सुरू केली आहे. पेटीएमच्या या मोहिमेअंतर्गत कंपनी विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकसारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. पेटीएमने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 'सणासुदीच्या काळात कंपनी आणि त्याचे भागीदार मार्केटिंग उपक्रमांवर 100 कोटी रुपये खर्च करतील.'

किती दिवस चालणार मोहीम?
भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याबरोबरच या मोहिमेत लोकांना कॅशबॅक जिंकण्याची संधी दिली जाईल. तसेच,पेटीएम यूपीआयबद्दल जागरूक करेल. ही मोहीम 14 नोव्हेंबरपर्यंत चालवली जाईल. सणासुदीच्या काळात मार्केटिंग उपक्रमांसाठी कंपनी आणि त्याचे सहयोगी 100 कोटी रुपयांचे वाटप करतील.

दररोज 10 लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी
ही मोहिम भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देईल आणि वापरकर्त्यांना मनी ट्रान्सफर, पेटीएम वॉलेट आणि पेटीएम पोस्टपेडसाठी पेटीएम यूपीआयबद्दल माहिती देतील. सणासुदीच्या काळात दररोज 10 भाग्यवान विजेत्यांना 1 लाख रुपये मिळतील. 10,000 विजेत्यांना 100 रुपये कॅशबॅक मिळेल, तर आणखी 10,000 वापरकर्त्यांना 50 रुपये कॅशबॅक मिळेल. दिवाळीच्या आसपास (1-3 नोव्हेंबर) वापरकर्ते दररोज 10 लाख रुपयांपर्यंत जिंकू शकतात.

कसे मिळेल कॅशबॅक?
तुमच्या मोबाईल, ब्रॉडबँड डीटीएच रिचार्ज, बिल पेमेंट, मनी ट्रान्सफर, ट्रॅव्हल तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, मूव्ही तिकीट बुकिंग, फास्टॅग पेमेंट, ऑनलाईन आणि ऑफलाइन किराणा स्टोअर व्यवहार इत्यादींसाठी पेटीएम वापरल्यावर कॅशबॅक दिला जाईल. जर तुम्ही दिवाळीच्या आसपास पेटीएममधून बिल पेमेंट किंवा कॅश ट्रान्सफर केले तर तुम्हाला कॅशबॅक मिळू शकेल.

कंपनीचा उद्देश काय?
"आमचा हेतू डिजिटल पेमेंटद्वारे अधिकाधिक वापरकर्त्यांना सशक्त करून भारतातील आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देणे आहे. आज वापरकर्ते त्यांचे बिल भरण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी, इतर सेवांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी पेटीएमवर येतात. धमाका साजरा करण्यासाठी पेटीएम कॅशबॅक सुरू करण्यात आला", असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

Web Title: Earn Money Great Cashback Offer From Paytm This Festive Season Chance To Win Up To Rs 1 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app