dominos pizza exit four international markets | मंदीचा मार... डॉमिनोज पिझ्झा बंद होणार, 'खादाड कंपनी'साठी 'बॅड न्यूज'
मंदीचा मार... डॉमिनोज पिझ्झा बंद होणार, 'खादाड कंपनी'साठी 'बॅड न्यूज'

नवी दिल्लीः डॉमिनोज पिझ्झा हा जगभरात चवीने खाल्ला जातो. पिझ्झेरियात जाऊन पिझ्झा खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. डोमिनिक्स या नावाने चालवायला घेतलेलं हे पिझ्झा शॉप अगदी अल्पकालावधीत अमेरिकेतील मिशिगनसिटीत लोकप्रिय झाला. त्यानंतर त्यांनी जगभरात विस्तार केला. परंतु आता काही देशांमध्ये Dominos Pizza तोट्यात आहे. जागतिक मंदीचा प्रभाव आता खाद्यसम्राट असलेल्या Dominos Pizzaवर पडण्यास सुरुवात झाली आहे.

ब्रिटनची ही कंपनी तोट्यात असून, चार देशांमधून लवकरच गाशा गुंडाळणार असल्याची चर्चा आहे. ब्रिटनच्या या सर्वात मोठ्या पिझ्झा डिलिव्हरी कंपनीनं सांगितलं की, Dominos Pizzaला मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं चार देशांमध्ये व्यवसाय हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली आहे. डॉमिनोजच्या या घोषणेनंतर पिझ्झा प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, या निर्णयासंदर्भात डॉमिनोजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड वाइल्ड म्हणाले, ज्या देशात आमच्या व्यवसायाला नुकसान होत आहे.

जिकडच्या देशातील बाजाराला आम्ही आकर्षिक करण्यात कमी पडलो आहोत, त्या देशातून आम्ही गाशा गुंडाळणार आहोत. परंतु भारतातल्या जनतेला याची चिंता करण्याची गरज नाही. डॉमिनोज भारतातून नव्हे, तर स्वित्झर्लंड, आइसलँड, नॉर्वे आणि स्वीडनसारख्या देशातून गाशा गुंडाळणार आहे. कारण या देशात डॉमिनोजला प्रचंड तोटा सहन करावा लागतोय. 

Web Title: dominos pizza exit four international markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.