lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार कोसळत असतानाही ए ग्रेडच्या मोजक्या कंपनी अजूनही स्थीर

शेअर बाजार कोसळत असतानाही ए ग्रेडच्या मोजक्या कंपनी अजूनही स्थीर

बाजार कोसळत असतानाही मोजक्या कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना कमी का होईना लाभांश देत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 02:31 PM2019-08-24T14:31:40+5:302019-08-24T14:31:45+5:30

बाजार कोसळत असतानाही मोजक्या कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना कमी का होईना लाभांश देत आहेत.

 Despite the stock market collapsing, a small number of A grade companies are still stable | शेअर बाजार कोसळत असतानाही ए ग्रेडच्या मोजक्या कंपनी अजूनही स्थीर

शेअर बाजार कोसळत असतानाही ए ग्रेडच्या मोजक्या कंपनी अजूनही स्थीर

- संजय खांडेकर

अकोला : शेअर बाजार सातत्याने कोसळत असतानाही नावाजलेल्या ए ग्रेडच्या काही कंपन्यांनी आपली प्रतिष्ठा जपली आहे. बाजार कोसळत असतानाही मोजक्या कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना कमी का होईना लाभांश देत आहेत. खऱ्या अर्थाने शेअर बाजारात सावधतेने गुंतवणूक करण्याची ही संधी असल्याचा सल्ला अर्थ विश्लेषक देत आहेत.
गत काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत असल्याने लहान गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडले आहे. कधीकाळी ६०० रुपये किमतीचे असलेले शेअर अलिकडे ६५ ते २ रुपयांपर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे शेअर बाजारातील लहान गुंतवणूकदाराने पै-पै गोळा करून लावलेला पैसा धोक्यात सापडला आहे. एकीकडे ही स्थिती आहे तर दुसरीकडे अजूनही घसरलेल्या शेअरच्या रकमेच्या आमिषाला बळी पडून काही गुंतवणूकदार डबघाईस आलेल्या कंपनीतच गुंतवणूक करीत आहेत. २००९, २०१२, २०१६ आणि २०१९ मध्ये बाजार कमालीचा कोसळल्याचा आलेख दिसत आहे. २०१९ मध्ये बाजार पन्नास टक्के घसरला होता. त्या तुलनेत शेअर बाजार बरा आहे. शेअर बाजार कमालीचा कोसळत असतानादेखील ए ग्रेडच्या नामांकित मोजक्या कंपनीने आपला दर्जा टिकवून ठेवला आहे. या कालावधीतही या कंपनीने २ ते १७ टक्क्यांपर्यंत लाभांश दिला. या व्यतिरिक्त बोनस वेगळे. अशा मोजक्या कंपन्यांमध्ये आयसीआयसी, कोटक बँक, इन्फोसीस, एशिएंट पेन्ट, बजाज फायनान्स, टीसीएस,पावर ग्रीन, हिन्दुस्तान लिवर, एचडीएफसी, एचसीएल टेक्नॉलॉजी, भारती एअरटेलसारख्या कंपनीचा समावेश आहे. मात्र काही ए ग्रेडच्या १५ ते २० कंपनीदेखिल डबघाईस आल्या आहेत. यामध्ये ज्या कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा कर्ज घेतले त्या बहुतांश कंपनी तोट्यात सापडल्यात, हे देखिल अधोरेखित आहे. आय.एल. अ‍ॅन्ड एफ.एस. कंपनी पाठोपाठ अनेक कंपन्यांची दिवाळखोरी समोर आली आहे. व्हिडिओकॉन, रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स पावर याचे ज्वलंत उदाहरण आहे.

- शेअर बाजारातील मंदी लक्षात घेता गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे; मात्र कोणत्या कंपनीत आपली रक्कम सुरक्षित असू शकते, याचा अभ्यास गुंतवणूकदारांनी करावा. मागील २५ वर्षांतही ज्या कंपनीने कर्ज न घेता प्रतिष्ठा जपली. कायम ए ग्रेडमध्ये राहून ज्या कंपनीने नेहमी बोनस दिला, ज्यांचे मॅनेजमेंट प्रोफे शनल आहे, अशा कंपनीतच गुंतवणूक करावी. अतिरिक्त कर्ज घेणाºया कंपनीतील गुंतवणूक धोक्याची ठरू शकते.
-हंसराज अग्रवाल, अर्थ विश्लेषक, अकोला.

 

Web Title:  Despite the stock market collapsing, a small number of A grade companies are still stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.