Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी ५ टक्के ठेवण्याची कापड उद्याेगाची मागणी

जीएसटी ५ टक्के ठेवण्याची कापड उद्याेगाची मागणी

सध्या कपड्यांवर ९९९ रुपयांपेक्षा कमी बिल झाल्यास ५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त बिल असल्यास १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. मात्र, एकच दर असण्याची मागणी या क्षेत्राकडून सातत्याने हाेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:38 AM2021-10-19T05:38:24+5:302021-10-19T05:38:43+5:30

सध्या कपड्यांवर ९९९ रुपयांपेक्षा कमी बिल झाल्यास ५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त बिल असल्यास १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. मात्र, एकच दर असण्याची मागणी या क्षेत्राकडून सातत्याने हाेत आहे.

Demand from textile industry to keep GST at 5 percent | जीएसटी ५ टक्के ठेवण्याची कापड उद्याेगाची मागणी

जीएसटी ५ टक्के ठेवण्याची कापड उद्याेगाची मागणी

बंगळुरू :  कापड उद्याेगाला काेराेना महामारीचा माेठा फटका बसला आहे. त्यातच जीएसटीचा दरही जास्त आहे. कपडे विक्रीवर सध्या असलेले दाेन दर रद्द करून १२ टक्के सरसकट जीएसटी लागू करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. मात्र, या क्षेत्राकडून हा दर ५ टक्के ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. 

सध्या कपड्यांवर ९९९ रुपयांपेक्षा कमी बिल झाल्यास ५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त बिल असल्यास १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. मात्र, एकच दर असण्याची मागणी या क्षेत्राकडून सातत्याने हाेत आहे. सरकार सरसकट १२ टक्के हा एकच दर ठेवण्याचा विचार करीत आहे. मात्र, तसे न करता ५ टक्केच दर ठेवण्याची मागणी या क्षेत्राकडून करण्यात आली आहे. कर्नाटक हाेजिअरी व गारमेंट्स असाेसिएशनचे सज्जन राज मेहता यांनी सांगितले, की महामारीचा माेठा फटका आमच्या उद्याेगाला बसला आहे. वर्क फ्राॅम हाेम तसेच लाेकांचे एकत्र येणे कमी झाल्यामुळे विक्री ५० टक्क्यांनी घटली आहे. लाेकांकडून कपड्यांवर खर्चही कमी करण्यात येत आहे. त्यातच कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे १२ टक्के जीएसटी लावल्यास या क्षेत्राला आणखी फटका बसेल, असे मेहता म्हणाले.

राेजगार संकटात
या क्षेत्रातील कामगारांचीही १२ टक्के जीएसटीच्या प्रस्तावामुळे चिंता वाढली आहे. एकट्या बंगळुरूमध्ये ४० हजार जणांचा राेजगार गेला आहे. जीएसटी वाढविल्यामुळे आणखी राेजगार जातील, असे जाणकारांचे मत आहे.

Web Title: Demand from textile industry to keep GST at 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी