lokmat Supervote 2024
Lokmat Money >क्रिप्टोकरन्सी > भारतात Binance, Kucoin, OKX सह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सच्या URL ब्लॉक, सरकारची मोठी कारवाई

भारतात Binance, Kucoin, OKX सह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सच्या URL ब्लॉक, सरकारची मोठी कारवाई

Binance, Kucoin, OKX यासह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट्स देशात ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 03:00 PM2024-01-13T15:00:37+5:302024-01-13T15:00:52+5:30

Binance, Kucoin, OKX यासह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट्स देशात ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

URL block of many crypto platforms including Binance Kucoin OKX in India big action by Govt | भारतात Binance, Kucoin, OKX सह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सच्या URL ब्लॉक, सरकारची मोठी कारवाई

भारतात Binance, Kucoin, OKX सह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सच्या URL ब्लॉक, सरकारची मोठी कारवाई

Binance, Kucoin, OKX यासह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट्स देशात ब्लॉक करण्यात आल्या आहेत. डिसेंबर २०२३ च्या अखेरीस, अर्थ मंत्रालयानं Binance सह ९ ऑफशोअर व्हर्च्युअल डिजिटल असेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्सना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही त्यांचे URL ब्लॉक करण्यास सांगितलं होतं. 

स्थानिक मनी लाँडरिंग कायद्यांचं पालन न करता भारतात बेकायदेशीरपणे कार्यरत असल्याचं समजलेल्या URL ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. या सूचनेच्या अनुषंगाने ही पाऊलं उचलली आहेत. अर्थ मंत्रालयानं Binance, Kucoin, Huobi, Kraken, Gate.io, Bittrex, Bitstamp, MEXC Global आणि Bitfinex यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Binance, Kucoin, OKX यासह यापैकी काही क्रिप्टो प्लॅटफॉर्म भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी देशातील अॅपल अॅप स्टोअरमधून हे क्रिप्टो प्लॅटफॉर्म काढून टाकण्यात आले होते. याची पुष्टी करताना, Binance च्या कस्टमर सपोर्ट हँडलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भातील माहिती दिली आहे. “आम्हाला एका IP ब्लॉकची माहिती आहे जी Binance सह अनेक क्रिप्टो फर्मवर परिणाम करत आहे. याचा परिणाम फक्त अशा युझर्सवर होत आहे जे भारतातून iOS अॅप स्टोअर किंवा Binance वेबसाइटला अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या वापरकर्त्यांकडे आधीच Binance अॅप आहे त्यांच्यावर परिणाम होणार नाही," असं त्यां नी यात म्हटलंय.

Web Title: URL block of many crypto platforms including Binance Kucoin OKX in India big action by Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.