Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >क्रिप्टोकरन्सी > Crypto मार्केटमध्ये भूकंप: Bitcoin अडीच वर्षांच्या नीचांकी स्तरावर; कोट्यवधी बुडाले, गुंतवणूकदार हादरले

Crypto मार्केटमध्ये भूकंप: Bitcoin अडीच वर्षांच्या नीचांकी स्तरावर; कोट्यवधी बुडाले, गुंतवणूकदार हादरले

Crypto Market Down: गेल्या दोन दिवसांपासून क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:47 IST2026-02-06T11:47:53+5:302026-02-06T11:47:53+5:30

Crypto Market Down: गेल्या दोन दिवसांपासून क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण?

Earthquake in Crypto Market marathi news Bitcoin hits 2 5 year low Billions lost investors huge loss | Crypto मार्केटमध्ये भूकंप: Bitcoin अडीच वर्षांच्या नीचांकी स्तरावर; कोट्यवधी बुडाले, गुंतवणूकदार हादरले

Crypto मार्केटमध्ये भूकंप: Bitcoin अडीच वर्षांच्या नीचांकी स्तरावर; कोट्यवधी बुडाले, गुंतवणूकदार हादरले

Crypto Market Down: गेल्या दोन दिवसांपासून क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या 'बिटकॉइन'चा भाव १२.६ टक्क्यांनी घसरून ६३,३०० डॉलरवर आला होता. ऑक्टोबर २०२४ नंतरची ही सर्वात नीचांकी पातळी असून नोव्हेंबर २०२२ च्या बाजार उलथापालथीनंतरची ही सर्वात मोठी दैनंदिन घसरण ठरली. आजही बिटकॉइन ९ टक्क्यांच्या घसरणीसह ६५,००० डॉलरवर व्यवहार करत आहे. या आठवड्यात बिटकॉइन १७ टक्क्यांनी, तर २०२६ मध्ये आतापर्यंत २८ टक्क्यांनी तुटलाय.

ईथर आणि मार्केट कॅपमध्ये मोठी घट

दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी 'ईथर'वरही मोठा दबाव दिसून आला असून एका दिवसात ती १३ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. २०२६ मध्ये ईथरमध्ये आतापर्यंत सुमारे ३८ टक्क्यांची घसरण झाली. धक्कादायक बाब म्हणजे, ऑक्टोबर २०२५ च्या विक्रमी उच्चांकापासून संपूर्ण क्रिप्टो मार्केटचे भांडवल (Market Cap) आतापर्यंत २ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त घटले आहे.

बाजार उघडताच चांदीच्या किमतीत १४ हजारांपेक्षा अधिक घसरण; सोनंही आपटलं, पाहा नवे दर

गुंतवणूकदारांची भीती आणि 'लिक्विडेशन'चा फटका

बाजार तज्ज्ञांच्या मते, जोखीम टाळण्याची प्रवृत्ती, तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समधील कमजोरी आणि अमेरिकेच्या कडक आर्थिक धोरणाच्या भीतीमुळे क्रिप्टो गुंतवणूकदार हादरले आहेत. 'कॉइनग्लास'च्या आकडेवारीनुसार, केवळ २४ तासांत सुमारे १ अब्ज डॉलरचे बिटकॉइन पोझिशन्स सक्तीनं बंद करण्यात आले. यामुळे विक्रीचा दबाव वाढला आणि संपूर्ण क्रिप्टो बाजारात 'डोमिनो इफेक्ट' पाहायला मिळाला.

जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

क्रिप्टो बाजारावर दबाव अशा वेळी आला आहे जेव्हा जागतिक गुंतवणूकदार जोखीम असलेल्या मालमत्तेपासून दूर जात आहेत. चांदीच्या दरात एकाच सत्रात १८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली, तर सोन्यातही अस्थिरता वाढली आहे. शेअर बाजारात S&P 500 सात आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे, तर नॅस्डॅक दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरलाय.

अमेरिकेचे आर्थिक धोरण आणि फेडरल रिझर्व्ह

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी 'केविन वॉर्श' यांची फेडरल रिझर्व्हच्या पुढील अध्यक्षपदी निवड केल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वॉर्श हे कठोर आर्थिक धोरण अवलंबू शकतात, अशी भीती विश्लेषकांना वाटत आहे. फेडची बॅलन्स शीट कमी करणं क्रिप्टोसाठी हानिकारक ठरू शकते, कारण क्रिप्टोकरन्सीला सहसा कमी व्याजदर आणि भरपूर लिक्विडिटीचा फायदा होतो.

संस्थागत गुंतवणूकदारांकडून पैसा काढला जातोय

डॉयचे बँकेच्या विश्लेषकांनुसार, संस्थागत 'एक्सचेंज ट्रेडेड फंड्स' (ETF) मधून सतत पैसे काढले जात असल्यानं ही घसरण तीव्र झाली आहे. जानेवारीमध्ये अमेरिकन स्पॉट बिटकॉइन ETFs मधून ३ अब्ज डॉलरहून अधिक रक्कम काढली गेली, तर डिसेंबरमध्ये २ अब्ज आणि नोव्हेंबरमध्ये ७ अब्ज डॉलर्सची रक्कम काढण्यात आली.

तंत्रज्ञान क्षेत्र आणि मायनर्सवरील दबाव

बिटकॉइनची किंमत आता तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्स, विशेषतः AI संबंधित शेअर्सच्या हालचालींशी सुसंगत दिसत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हॅल्युएशनमध्ये सुधारणा झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी डिजिटल मालमत्तेतील आपली जोखीम कमी केली आहे. तसेच, जर किमती आणखी घसरल्या तर 'क्रिप्टो मायनर्स'वर दबाव वाढू शकतो आणि सक्तीच्या लिक्विडेशनमुळे घसरणीचं एक दुष्टचक्र सुरू होऊ शकतं, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

Web Title : क्रिप्टो बाजार में भूचाल: बिटकॉइन में गिरावट, निवेशकों को भारी नुकसान

Web Summary : बिटकॉइन 2.5 साल के निचले स्तर पर, बाजार में भारी गिरावट। अमेरिकी मौद्रिक नीति और परिसमापन के डर से निवेशकों को अरबों का नुकसान हुआ। इथेरियम भी गिरा, और संस्थागत निवेशक धन निकाल रहे हैं, जिससे गिरावट और बढ़ रही है। वैश्विक बाजार अस्थिरता ने क्रिप्टो संकट को और बढ़ावा दिया।

Web Title : Crypto Market Crash: Bitcoin Plunges, Investors Lose Billions, Panic Grips Market

Web Summary : Bitcoin crashed to a 2.5-year low, triggering a market-wide selloff. Billions were wiped out as investors panicked amid fears of stricter US monetary policy and liquidations. Ethereum also plummeted, and institutional investors are withdrawing funds, exacerbating the decline. Global market instability further fueled the crypto crisis.