Lokmat Money >क्रिप्टोकरन्सी > विक्रमी पातळीवर पोहोचला Bitcoin, पहिल्यांदाच ७० हजार डॉलर्सपार पोहोचली Crypto

विक्रमी पातळीवर पोहोचला Bitcoin, पहिल्यांदाच ७० हजार डॉलर्सपार पोहोचली Crypto

८ मार्च रोजी बिटकॉइनने विक्रमी उच्चांक गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:15 PM2024-03-09T13:15:02+5:302024-03-09T13:15:26+5:30

८ मार्च रोजी बिटकॉइनने विक्रमी उच्चांक गाठला.

Bitcoin reached a record level Crypto reached 70 thousand dollars for the first time details | विक्रमी पातळीवर पोहोचला Bitcoin, पहिल्यांदाच ७० हजार डॉलर्सपार पोहोचली Crypto

विक्रमी पातळीवर पोहोचला Bitcoin, पहिल्यांदाच ७० हजार डॉलर्सपार पोहोचली Crypto

८ मार्च रोजी बिटकॉइनने विक्रमी उच्चांक गाठला. क्रिप्टोसंदर्भात असलेल्या वातावरणामुळे गुंतवणूकदार यासंदर्भात सक्रिय दिसून येत आहेत. ही क्रिप्टोकरन्सी प्रथमच ७० हजार डॉलर्सवर पोहोचली. जागतिक स्तरावर व्याजदरात घट होण्याची अपेक्षा आणि अमेरिकेच्या नवीन स्पॉट एक्स्चेंजमधील (क्रिप्टो प्रोडक्ट्स) गुंतवणूकदारांकडून मागणी यामुळे त्याला वेग मि़ळाला आहे.
 

गेल्या काही आठवड्यांत ETF मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे आणि मार्केटला अशा आऊटलूककडून सपोर्ट मिळतोय, ज्यात Ethereum blockchain प्लॅटफॉर्मच्या अपग्रेडचा समावेश आहे. यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं जानेवारीच्या उत्तरार्धात ११ स्पॉट बिटकॉइन ईटीएफ मंजूर केले. याआधी, क्रिप्टो मार्केटला १८ महिन्यांसाठी हाय प्रोफाइल कॉर्पोरेट बँकरप्सी आणि घोटाळ्यांचा सामना करावा लागला होता.
 

अनिश्चिततेमुळे यापासून दूर गेलेल्या इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचं स्वारस्यदेखील क्रिप्टोमध्ये वाढत आहे. हे गुंतवणूकदारही आता या दीर्घकालीन फंडात गुंतवणूक करू लागले आहेत. अशा गुंतवणुकीमुळे बिटकॉइनमधील वाढ कायम ठेवण्यास मदत होऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. १ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात १० सर्वात मोठ्या यूएस स्पॉट बिटकॉइन फंडांमध्ये नेट इनफ्लो २.२ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे.
 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Bitcoin reached a record level Crypto reached 70 thousand dollars for the first time details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.