Cryptocurrency News: गेल्या काही वर्षांत भारतात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक लक्षणीय वाढली आहे. मात्र, त्यात अनेक कायदेशीर अडथळे आणि अधिक कर हे प्रकार आहेत. चेन अॅनालिसिसच्या ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्सनुसार क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याच्या बाबतीत भारत सलग दुसऱ्या वर्षी जगातील अव्वल देशांपैकी एक आहे. तरुणांमुळे हा ट्रेंड वाढत आहे. सीए नितीन कौशिक यांनी क्रिप्टोमध्ये आंधळेपणाने पैसे गुंतवू नका, असा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी एका गुंतवणूकदाराची कहाणी सांगितली आहे. क्रिप्टोमध्ये त्याचं मोठं नुकसान झालंय.
काही गुंतवणूकदार विचार न करता अनरेग्युलेटेड क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून तोटा सहन करत आहेत. जर तुम्ही तोटा सहन करण्यास तयार नसाल तर तुम्ही गुंतवणूक करू नका, असा सल्ला नितीन कौशिक यांनी दिलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक धक्कादायक किस्सा शेअर केलाय. ते म्हणाले की, एका स्टार्टअपच्या मालकानं, ज्याचे मासिक उत्पन्न ५ लाख रुपये आहे, गेल्या वर्षी अनरेग्युलेटेड क्रिप्टो प्रोजेक्टमध्ये ७० लाख रुपयांची गुंतवणूक केली. आता त्यांचा संपूर्ण पोर्टफोलिओ फक्त ४ लाख रुपयांचा आहे. "जर तुम्ही तोटा सहन करण्यास तयार नसाल तर यात गुंतवणूक करू नये," असं ते म्हणाले.
क्रिप्टोमध्ये अनेक चढ-उतार
क्रिप्टोकरन्सीनं २०२५ मध्ये चढ-उतार पाहिले आहेत, परंतु शक्यता देखील आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोचं समर्थन केल्यानंतर डिजिटल मालमत्ता आणि क्रिप्टोशी संबंधित शेअर्समध्ये तेजी आली आहे. काही अडथळे आले असले तरी बाजाराची धारणा सकारात्मक आहे.
A startling story today:
— CA Nitin Kaushik (@Finance_Bareek) March 27, 2025
🟢 Monthly income: ₹5L (Startup founder)
🔴 Invested ₹70L in unregulated crypto projects last year.
🔴 Entire portfolio now worth ₹4L.
If you’re not ready to lose it, you’re not ready to invest in it.#stockmarketcrash#Nifty#Finance#Investing
क्रिप्टोकरन्सीमध्ये लोकांचा रस वाढला
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) सर्वेक्षणानुसार, किरकोळ गुंतवणूकदार आता पारंपारिक शेअर्सपेक्षा क्रिप्टोकरन्सीमध्ये अधिक रस दाखवत आहेत. ग्लोबल रिटेल इन्व्हेस्टर आउटलुक २०२४ नुसार, २९% गुंतवणूकदार शेअर्स टाळतात कारण त्यांना ते समजत नाही. तर क्रिप्टोकरन्सीबद्दल असंच म्हणणाऱ्यांपैकी केवळ २४ टक्के आहेत. यावरून डिजिटल मालमत्ता हा आता गुंतवणुकीचा अधिक सोपा पर्याय मानला जात असल्याचं दिसून येतंय.