lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > coronavirus : व्याज, ईएमआयबाबत बँकांकडून मौन, कर्जदारांमध्ये संभ्रम

coronavirus : व्याज, ईएमआयबाबत बँकांकडून मौन, कर्जदारांमध्ये संभ्रम

रिझर्व्ह बँकेने पुढील तीन महिने कर्जदारांकडून ईएमआय वसूल करू नये असा सल्ला बँकांना दिला होता. मात्र याबाबत देशातील बहुतांश बँकांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:19 PM2020-03-31T13:19:41+5:302020-03-31T13:24:03+5:30

रिझर्व्ह बँकेने पुढील तीन महिने कर्जदारांकडून ईएमआय वसूल करू नये असा सल्ला बँकांना दिला होता. मात्र याबाबत देशातील बहुतांश बँकांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे.

coronavirus: Many banks Silence about interest & EMI, confusion in among custmer's BKP | coronavirus : व्याज, ईएमआयबाबत बँकांकडून मौन, कर्जदारांमध्ये संभ्रम

coronavirus : व्याज, ईएमआयबाबत बँकांकडून मौन, कर्जदारांमध्ये संभ्रम

Highlightsरिझर्व्ह बँकेने पुढील तीन महिने कर्जदारांकडून ईएमआय वसूल करू नये असा सल्ला बँकांना दिला होतायाबाबत देशातील बहुतांश बँकांनी आतापर्यंत मौन बाळगले आहेईएमआयबाबत बँकेने सवलत न दिल्यास दर महिन्याप्रमाणे तुमच्या खात्यातून ईएमआय कापला जाईल

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले असून, कोट्यवधी कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने पुढील तीन महिने कर्जदारांकडून ईएमआय वसूल करू नये असा सल्ला बँकांना दिला होता. मात्र याबाबत देशातील बहुतांश बँकांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात आपल्या खात्यामधून ईएमआय कापला जाणार की नाही याबाबत कर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ईएमआयबाबत बँकांना सल्ला देऊन आठवडा उलटत आला तरी बहुतांश बँकांनी त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. तसेच काही बँकांनी तर ईएमआय वसुलीबाबत कर्जदारांना मेसेजही पाठवले आहेत. हे मेसेज नेहमीप्रमाणे असून, अमूक तारखेला तुमच्या खात्यामधून ईएमआयची रक्कम कपली जाणार आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात आवश्यक ती रक्कम ठेवा, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील चिंता वाढली आहे.

 मात्र याला अपवाद आहे तो एसबीआयचा. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने ईएमआयची वसुली पुढच्या तीन महिन्यांसाठी थांबवली आहे. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी गेल्या शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली होती. कर्जदाराच्या ईएमआयच्या तीन हप्त्यांची वसुली टळण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यासाठी कर्जदारांना कुठलाही अर्ज भरावा लागणार नाही. तसेच, त्यांच्या क्रेडिट स्कोअरवरही कुठला परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, इतर सरकारी आणि काही खासगी बँका ईएमआयबाबत कर्जदारांना सवलत देण्याचा विचार करत आहेत. त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

आता तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेने ईएमआयच्या वसुलीमध्ये सवलत दिल्यास तशा आशयाचा मेसेज किंवा मेल तुम्हाला येईल. तसेच तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून ईएमआयमधील सवलतीबाबत माहिती मिळवू शकता.  अशा परिस्थितीत ईएमआयमध्ये सवलत देण्याची विनंतीही तुम्ही बँकेला करू शकता. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा खरोखरच तुमच्या मासिक उत्पन्नाला फटका बसला आहे हे तुम्हाला स्पष्ट करावे लागेल. मात्र याबाबत अंतिम निर्णय बँकच घेईल. तसेच ईएमआयबाबत बँकेने सवलत न दिल्यास दर महिन्याप्रमाणे तुमच्या खात्यातून ईएमआय कापला जाईल.

Web Title: coronavirus: Many banks Silence about interest & EMI, confusion in among custmer's BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.