Coronavirus: Allow 25-35% IT employees to work from campus, demands Mohandas Pai | Coronavirus : २५ ते ३५ टक्के आयटी कर्मचाऱ्यांना कॅम्पसमधून कामाची परवानगी द्या, मोहनदास पै यांची मागणी

Coronavirus : २५ ते ३५ टक्के आयटी कर्मचाऱ्यांना कॅम्पसमधून कामाची परवानगी द्या, मोहनदास पै यांची मागणी

बंगळुरू : माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २५ ते ३५ टक्के कर्मचाºयांना कॅम्पसमधून काम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या क्षेत्रातील ज्येष्ठ अधिकारी टी.व्ही. मोहनदास पै
यांनी केली आहे. जगभरात पसरलेल्या आपल्या ग्राहकांची आयटी
यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे, असेही पै यांनी सांगितले.
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर देशभरात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी पै यांनी केली आहे. बलाढ्य आयटी कंपनी इन्फोसिसचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) असलेल्या पै यांनी सांगितले की, आयटी कंपन्या कुठल्याही परिस्थितीत आपले व्यवसाय सातत्य कायम ठेवणार आहेत.
कंपन्या ते करीतही आहेत. मात्र, त्यासाठी किमान २५ ते ३५ टक्के कर्मचारी वर्ग कंपनीच्या कॅम्पसमध्ये असणे आवश्यक आहे. आयटी कंपन्यांचे ग्राहक जगभरात पसरलेले आहेत. त्यांची यंत्रणा नियमित राखणे आवश्यक आहे.

- पै यांनी सांगितले की, प्रत्येक २२जण घरून काम करू शकत नाही. आयटी उद्योगाची यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी काही कर्मचाºयांनी कॅम्पसमधूनच काम करणे आवश्यक आहे. हे फारच महत्त्वाचे आहे. म्हणून आयटी कंपन्यांच्या बाबतीत काही प्रमाणात लवचिकता दाखविणे आवश्यक आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर लोक जेव्हा परत येतील, तेव्हा त्यांच्यावर रोजगार गमावण्याची वेळ येता कामा नये. १५ दिवसांनी (कोविड-१९ संकट संपल्यानंतर) रोजगार अदृश्य होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी आपण सावध राहिले पाहिजे आणि योग्य योजना आखली पाहिजे. घाबरून जाता कामा नये.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Allow 25-35% IT employees to work from campus, demands Mohandas Pai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.