CoronaVirus : 63 crore people finance ministry extends motor health insurance validity till 21 april vrd | CoronaVirus : नो टेन्शन! वाहन अन् आरोग्य विमा पॉलिसीत बदल; 63 कोटी लाभार्थ्यांना दिलासा

CoronaVirus : नो टेन्शन! वाहन अन् आरोग्य विमा पॉलिसीत बदल; 63 कोटी लाभार्थ्यांना दिलासा

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.आता पुन्हा एकदा त्यांनी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. २३ कोटी वाहन मालक आणि ४० कोटी नागरिकांना केंद्रीय अर्थमंत्रालयानं मोठं  गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं २१ एप्रिल २०२०पर्यंत विम्याचा हप्ता भरण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवी दिल्लीः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कामधंदे ठप्प असल्यानं अनेकांना पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे गृह, वाहन किंवा अन्य हप्ते कसे फेडायचे याचीच चिंता सामान्यांना सतावते आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारामण यांनी दिलासादायक घोषणा केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. २३ कोटी वाहन मालक आणि ४० कोटी नागरिकांना केंद्रीय अर्थमंत्रालयानं मोठं  गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं २१ एप्रिल २०२०पर्यंत विम्याचा हप्ता भरण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोना व्हायरसनं पूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे काही जणांचा पगारही होत नसून अनेक व्यवसाय बंद असल्यानं रोजगार बुडाला आहे. नव्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं विमा अधिनियम १९३८च्या कलम ६४VBमध्ये संशोधन केलं आहे. या कायद्यात विम्याच्या हप्ता भरल्याशिवाय विमा संरक्षण मिळणार नसल्याचं अधोरेखित करण्यात आलं होतं. त्यात आता सरकारनं बदल केलेला आहे. त्यामुळे वाहन मालक आणि आरोग्य विमा संरक्षण लाभार्थ्यांच्या पॉलिसीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. २५ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. म्हणजेच तुमच्या पॉलिसीचा अवधी आणखी १० दिवसांनी वाढला आहे. जर तुमची पॉलिसी संपली असली तरी आपल्याला विम्याचा लाभ मिळणार आहे. 

फोन पेवर १५६ रुपयांत मिळतोय ५० हजारांचा विमा
डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या फोन पेच्या माध्यमातून १५६ रुपयांत ५० हजारांचं विमा संरक्षण मिळत आहे. फोन पेनं बजाज एलायन्स जनरल इन्श्युरन्स (Bajaj Allianz General Insurance)च्या मदतीनं कोरोना केअर नावाच्या नव्या पॉलिसीची घोषणा केली आहे. फोन पेवर फक्त १५६ रुपयांत आपल्याला ५० हजारांचं विमा संरक्षण मिळणार आहे. ५५ वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना या पॉलिसीचा लाभ घेता येणार  आहे. 
या पॉलिसीमध्ये प्री-हॉस्पिटलायजेशन आणि पोस्ट-केअर मेडिकल ट्रीटमेंटच्या एका महिन्याच्या खर्चाचा समावेश आहे. फोन पेवर My Money सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन माध्यमातून आपण ही खरेदी  करू शकता. त्यासाठी फक्त दोन मिनिटांचा अवधी लागतो आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : 63 crore people finance ministry extends motor health insurance validity till 21 april vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.