Lokmat Money > बिझनेस न्यूज > करदात्यांना मोठा दिलासा! आता 'हे' दोन फॉर्म सादर करण्याची मुदत वाढवली

करदात्यांना मोठा दिलासा! आता 'हे' दोन फॉर्म सादर करण्याची मुदत वाढवली

taxpayers : आधीची अंतिम तारीख 15 जुलै 2021 होती. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या पोर्टलमध्ये अडचणी येत असल्याने त्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:00 PM2021-07-21T15:00:29+5:302021-07-21T15:16:32+5:30

taxpayers : आधीची अंतिम तारीख 15 जुलै 2021 होती. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या पोर्टलमध्ये अडचणी येत असल्याने त्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली

CBDT grants further relaxation in electronic filing of forms 15CA & 15CB in view of difficulties reported by taxpayers in filing of the forms online | करदात्यांना मोठा दिलासा! आता 'हे' दोन फॉर्म सादर करण्याची मुदत वाढवली

करदात्यांना मोठा दिलासा! आता 'हे' दोन फॉर्म सादर करण्याची मुदत वाढवली

नवी दिल्ली : करदात्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जर तुम्ही देखील कर भरण्याच्या शेवटच्या तारखेवरून चिंतेत असाल तर आता तुमचा चिंता थोडी कमी झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) फॉर्म 15CA आणि 15CB ची मॅन्युअली भरण्यासाठी अंतिम मुदत वाढविली आहे. आता तुम्ही हा फॉर्म 15 ऑगस्ट 2021 पर्यंत भरू शकता. (CBDT grants further relaxation in electronic filing of forms 15CA & 15CB in view of difficulties reported by taxpayers in filing of the forms online on http://incometax.gov.in. Date for submission of forms in manual format to the authorised dealers is extended to 15th August,2021)

दरम्यान, आधीची अंतिम तारीख 15 जुलै 2021 होती. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या पोर्टलमध्ये अडचणी येत असल्याने त्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाचे नवीन पोर्टल 7 जूनपासून सुरू झाले. त्यानंतर करदात्यांना सातत्याने अडचणींचा सामाना करावा लागत होता. यामुळे विभागाने अंतिम तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला.

प्राप्तिकर अधिनियम 1961 (Income Tax Act 1961) नुसार, प्राप्तिकर पोर्टलवर फॉर्म 15CA/15CB हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फाईल करणे आवश्यक आहे. फॉर्म 15CA रेमिटरद्वारे असे डिक्लेरेशन होते की, अनिवासींना (नॉन-रेजिडेंटसाठी) पैसे भरल्याप्रकरणी सोर्सवर कर वजा केला गेला आहे, तर फॉर्म 15CB हा सीएद्वारे सादर केलेले प्रमाणपत्र आहे की, ओव्हरसीज देयकाच्या वेळी प्रासंगिक कर करार आणि आयटी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात आले आहे.

फॉर्म जमा केल्यानंतरच विदेशात पैसे पाठवू शकता
दरम्यान, अधिकृत विक्रेते (बँका) हे फॉर्म सबमिट केल्यावरच विदेशात पैसे पाठवू शकतात. त्याआधी ते पैसे पाठवू शकत नाही. आता तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत आरामात 15CA/15CB मॅन्युअल फॉर्मेटमध्ये सबमिट करू शकता. सीबीडीटीने असेही म्हटले आहे की, हे फॉर्म नंतरच्या तारखेला अपलोड करण्यासाठी नवीन ई-फाइलिंग पोर्टलवर सुविधा दिली जाईल जेणेकरून डॉक्युमेंटेशन आयडेंटिफिकेशन नंबर (commentation identification number) जनरेट होऊ शकेल.

Read in English

Web Title: CBDT grants further relaxation in electronic filing of forms 15CA & 15CB in view of difficulties reported by taxpayers in filing of the forms online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.