लयभारी! स्वस्त किमतीत घरं आणि दुकानं विकतेय सरकारी बँक, उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:13 PM2021-07-27T19:13:10+5:302021-07-27T19:14:00+5:30

BoB Mega E-Auction: बँक ऑफ बडोदानं मेगा ऑनलाइन लिलावाच्या माध्यमातून स्वस्त दरात घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

BoB Mega E Auction to be held on 28th July 2021 get your dream home in low price | लयभारी! स्वस्त किमतीत घरं आणि दुकानं विकतेय सरकारी बँक, उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

लयभारी! स्वस्त किमतीत घरं आणि दुकानं विकतेय सरकारी बँक, उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Next

BoB Mega E-Auction: बँक ऑफ बडोदानं मेगा ऑनलाइन लिलावाच्या माध्यमातून स्वस्त दरात घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. बँकेकडून २८ जुलै रोजी मेगा इ-ऑक्शनचं आयोजन केलं आहे. यात लिलावात सामील होऊन तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर स्वस्त किमतीत खरेदी करू शकतात. बँकेकडून लिलावासाठी देशातील विविध ठिकाणांच्या मालमत्ता काढण्यात आल्या आहेत. (BoB Mega E Auction to be held on 28th July 2021 get your dream home in low price)

बँक ऑफ बडोदानं ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. फ्लॅट्स, ऑफिस स्पेस, लँड स्पेस आणि इंडस्ट्रिअल प्रॉपर्टी यांचा लिलावात समावेश असणार आहे. विशेष म्हणजे यातील मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज देखील उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. याशिवाय लिलावात घर खरेदी केल्यानंतर घराचा ताबा तातडीनं दिला जाणार आहे. सर्व मालमत्ता कायदेशीरित्या पूर्णपणे वैध असून त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया बँकेनं पूर्ण केली आहे. 

तुम्हाला नेमकं कोणत्या शहरांमध्ये या मालमत्ता खरेदी करता येतील याची माहिती https://www.bankofbaroda.in/property-search.htm  या लिंकवर क्लिक करुन जाणून घेता येणार आहे. यात सुरुवातीला तुम्हाला तुमचं राज्य निवडावं लागणार आहे. त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यांत संबंधित मालमत्ता आहेत याची माहिती तुम्हाला मिळेल. त्यानुसार संबंधित शहराचं नाव आणि पिन कोड, मालमत्तेचं स्वरूप, पजेशन टाइप, ओनरशिप टाइम आणि किंमत याची सर्व माहिती भरून सबमिट करा. तुम्हाला तुमच्या पसंतीनुसारची मालमत्तेची माहिती देण्यात येईल. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BoB Mega E Auction to be held on 28th July 2021 get your dream home in low price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app