मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आता जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, बिल गेट्स आता पाचव्या स्थानावरून १२व्या स्थानावर घसरले आहेत, त्यांची एकूण संपत्ती १२४ अब्ज डॉलर्स एवढी आहे. महत्वाचे म्हणजे, बिल गेट्स यांची संपत्ती एका आठवड्यात ५२ अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. ते मायकेल डेल यांच्या अगदी खालो खाल आहेत. याच बरोबर, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे रँकिंग अद्यापही बिल गेट्स यांच्या खालीच आहे.
असं आहे घसरणीचं मुख्य कारण ? -
याचे मुख्य कारण म्हणजे, बिल गेट्स यांची आपली अधिकांश संपत्ती दान करण्याची दीर्घकालीन योजना. गेट्स फाउंडेशनच्या वेबसाइटनुसार, बिल गेट्स आणि त्यांची एक्स पत्नी मेलिंडा गेट्स यांनी गेल्या वर्षीपर्यंत एकूण ६० अब्ज डॉलर्स दान केले आहेत. ही मोठी देणगी गेट्स फाउंडेशनच्या जागतिक आरोग्य आणि शिक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना समर्थन देत.
यासंदर्भबात बोलताना गेट्स म्हणतात, आता त्यांची संपत्ती खर्च केल्याने अनेक लोकांचे जीवन वाचण्यास आणि सुधारण्यास मदत होईल, ज्याचा फाउंडेशन बंद झाल्यानंतरही सकारात्मक परिणाम दिसेल. महत्वाचे म्हणजे, ही घोषणा २०४५ मध्ये गेट्स फाउंडेशन बंद होण्याचेही संकेत देते.
आधी फाउंडेशन बंद करण्याची होती योजना -
पूर्वी गेट्स यांच्या मृत्यूच्या दोन दशकांनंतर, फाउंडेशन बंद करण्याची योजना होती. मात्र, आता त्याची अंतिम मुदत २०४५ करण्यात आली आहे. उर्वरित दोन दशकांमध्ये, फाउंडेशन दरवर्षी सुमारे नऊ अब्ज डॉलर्स एवढे बजेट कायम ठेवेल. २५ वर्षांपूर्वी स्थापन झाल्यापासून या फाउंडेशनने १०० अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. आतापर्यंत, या फाउंडेशनला वॉरेन बफेकडून ४१ टक्के रक्कम मिळाली आहे. तर उर्वरित रक्कम गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या कमाईतून दिली आहे. गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी २००० मध्ये या फाउंडेशनची स्थापना केली होती. याच्या माध्यमाने जागतिक आरोग्य आणि शिक्षणाच्या सुधारणेसाठी काम केले जाते.