Salary Account Opening : नोकरी करणाऱ्यांना आपलं सॅलरी अकाऊंट स्वतंत्रपणं उघडणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही नोकरी करत असाल तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) तुम्ही तुमचं सॅलरी अकाऊंट उघडू शकता. जर तुम्ही एसबीआयमध्ये तुमचं सॅलरी अकाऊंट उघडलं तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. एसबीआयमधील सॅलरी विशेषत: केंद्र सरकार, राज्य सरकार, संरक्षण दल, कॉर्पोरेट संस्था इत्यादींसाठी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला अॅडव्हान्स आणि सिक्योर नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सर्व्हिसेस सारखे अनेक उत्तम फीचर्स देखील मिळतील. आज जाणून घेऊया एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट उघडण्याचे काय फायदे आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
फ्री इन्शुरन्स आणि लोनचा फायदा
एसबीआयमध्ये सॅलरी खातं उघडल्यावर ग्राहकाला १ कोटी रुपयांपर्यंतचे मोफत हवाई अपघात विमा (मृत्यू) संरक्षण दिलं जातं. त्याचबरोबर खातेदाराला ४० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक अपघात विमा (मृत्यू) कव्हर मोफत मिळतं. याशिवाय पर्सनल लोन, होम लोन, कार लोन आणि एज्युकेशन लोनही अतिशय आकर्षक व्याजदरात दिलं जातं.
यावर ५० टक्क्यांपर्यंत सूट
एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असेल तर ग्राहकाला वार्षिक लॉकर भाड्यावर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळते. शिवाय ऑटो-स्वाइपचा फायदा घेऊन तुम्ही ई-एमओडी (मल्टी ऑप्शन डिपॉझिट) तयार करू शकता आणि जास्त व्याज मिळवू शकता. ऑन-बोर्डिंगच्या वेळी तुम्ही डीमॅट आणि ऑनलाइन ट्रेडिंग अकाउंटचा फायदा घेऊ शकता.