नवीन वर्षात जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत कामाची आहे. सध्याच्या काळात काही बँका अवघ्या ७.४०% च्या सुरुवातीच्या व्याजदरासह कार लोन ऑफर करत आहेत, जी सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. कार लोन घेण्यापूर्वी थोडा 'होम वर्क' करून तुम्ही सर्वोत्तम डील मिळवू शकता. चला तर मग, व्याजदरापासून ते EMI कॅल्क्युलेशनपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
सरकारी बँकांकडून स्वस्त कार लोन
२०२६ च्या सुरुवातीला कार लोनचे व्याजदर खूपच स्पर्धात्मक आहेत. अनेक सरकारी बँका पात्र ग्राहकांना ८ टक्क्यांपेक्षा कमी व्याजदरांवर कार लोन देत आहेत. कमी व्याजदरामुळे तुमची मासिक EMI तर कमी होतोच, पण संपूर्ण कर्ज कालावधीत भरल्या जाणाऱ्या एकूण व्याजामध्येही मोठा फरक पडतो. Paisabazaar.com नुसार, जानेवारी २०२६ मध्ये कार लोनचे दर हे कर्ज देणारी संस्था, ग्राहकाचा क्रेडिट प्रोफाइल आणि बँकेसोबतचे त्यांचे संबंध यावर अवलंबून आहेत. सध्या बाजारात कार लोनचे दर ७.४०% पासून सुरू होऊन १४% पर्यंत जात आहेत. त्यामुळे सर्वात स्वस्त पर्याय निवडण्यासाठी विविध बँकांच्या दरांची तुलना करणं गरजेचं आहे.
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
येथे मिळत आहे अवघ्या ७.४०% दराने कर्ज
सरकारी बँकांचा विचार केल्यास, युनियन बँक ऑफ इंडिया वार्षिक ७.४० टक्के या सर्वात कमी सुरुवातीच्या दराने कर्ज देत आहे. पंजाब नॅशनल बँक, युको बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचे सुरुवातीचे दर देखील ७.५० टक्क्यांच्या आसपास आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया हा देखील एक चांगला पर्याय असून त्यांचे दर ७.६० ते ९.२० टक्क्यांच्या दरम्यान आहेत; विशेष म्हणजे ही बँक ३१ मार्च २०२६ पर्यंत प्रोसेसिंग फी देखील माफ करत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सध्याच्या होम लोन ग्राहकांना आणि किमान सहा महिने बँकेशी संबंधित असलेल्या ग्राहकांना व्याजात ०.२५% सवलत देत आहे.
₹१० लाखांवर ५ वर्षांसाठी EMI किती?
कार लोनचा व्याजदर तुमचं वय, उत्पन्न, सिबिल स्कोर आणि क्रेडिट हिस्ट्री यावर अवलंबून असतो. जर तुम्ही सर्व अटी पूर्ण करत असाल, तर तुम्ही ७.४० टक्के दराने कर्ज मिळवू शकता. युनियन बँक कार लोन कॅल्क्युलेटरनुसार, ७.४० टक्के व्याजावर ५ वर्षांसाठी १० लाख रुपयांच्या कर्जावर मासिक EMI ₹१९,९९०.४६ असेल. या हिशोबानुसार, ५ वर्षांत तुम्हाला ₹१,९९,४२७.७७ व्याजापोटी भरावे लागतील. म्हणजेच शेवटी तुम्हाला बँकेला एकूण ₹११,९९,४२७.७७ परत करावे लागतील.
खाजगी बँकांची कार लोन थोडी महाग
खाजगी क्षेत्रातील बँका सरकारी बँकांच्या तुलनेत थोड्या जास्त व्याजदरानं कार लोन ऑफर करत आहेत. उदाहरणार्थ, एचडीएफसी (HDFC) बँक कार लोनची सुरुवात ८.२० टक्क्यांपासून करत आहे, तर आयसीआयसीआय (ICICI) बँकेचा सुरुवातीचा दर ८.५० टक्के आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक आणि फेडरल बँक यांचे कार लोन तुलनेनं महाग आहेत
