Lokmat Money >बँकिंग > आता फाटक्या नोटा बदलण्यासाठी बँकेत खेटा घालण्याची गरज नाही; 'या' मेळाव्यात मिळतेय मोफत सुविधा

आता फाटक्या नोटा बदलण्यासाठी बँकेत खेटा घालण्याची गरज नाही; 'या' मेळाव्यात मिळतेय मोफत सुविधा

Bank Note Exchange Mela : सध्या बाजारात फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या काही नोटा पाहायला मिळतात. जर तुमच्याकडेही अशा नोटा असतील तर तुम्ही त्या बदलून घेऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:37 IST2025-02-24T15:37:32+5:302025-02-24T15:37:54+5:30

Bank Note Exchange Mela : सध्या बाजारात फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या काही नोटा पाहायला मिळतात. जर तुमच्याकडेही अशा नोटा असतील तर तुम्ही त्या बदलून घेऊ शकता.

what is rbi bank note exchange mela check details | आता फाटक्या नोटा बदलण्यासाठी बँकेत खेटा घालण्याची गरज नाही; 'या' मेळाव्यात मिळतेय मोफत सुविधा

आता फाटक्या नोटा बदलण्यासाठी बँकेत खेटा घालण्याची गरज नाही; 'या' मेळाव्यात मिळतेय मोफत सुविधा

Bank Note Exchange Mela : देशात डिजिटल क्रांती झाल्यापासून सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत आहेत. मात्र, अजूनही रोखीने व्यवहार करणारे लोकही कमी नाहीत. तुम्ही देखील रोखीने व्यवहार करत असाल तर एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल. सध्या बाजारात असलेल्या अनेक नोटा फाटलेल्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत या नोटा स्वीकारण्यावरुन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची पाहायला मिळते. जर तुमच्याकडेही अशा नोटा असतील तर मेळाव्यातून तुम्ही बदलून घेऊ शकता. मेळावा शब्द वाचून आश्चर्य वाटलं ना? पण, हा मेळावा कुठल्या पक्षाचा नाही तर आरबीआयचा असतो.

देशात बँक नोट मेळावेही आयोजित केले जातात. जिथे आरबीआय आणि इतर बँकांचे अधिकारी लोकांना नोटांशी संबंधित अनेक सेवा देतात. वास्तविक, बँक नोट एक्सचेंज फेअर हा असा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये लोक जीर्ण किंवा फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करू शकतात आणि त्यांच्या जागी नवीन नोट किंवा नाणी मिळवू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आर्थिक साक्षरता आणि क्लीन नोट धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करते.

बँक नोट एक्सचेंज मेळाव्या कोणत्या सुविधा मिळतात?
RBI किंवा बँक शाखा बॅक नोट फेअर सारख्या कार्यक्रमात स्टॉल लावतात.
या स्टॉल्सवर, ग्राहक त्यांच्या फाटलेल्या आणि जीर्ण नोटा नवीन नोटा किंवा नाण्यांच्या बदल्यात घेऊ शकतात.
या कार्यक्रमात नोटा बदलण्याबरोबरच आर्थिक साक्षरताही दिली जाते. सायबर आणि डिजिटल फसवणूक विषयी माहिती दिली जाते.

येथेही खराब नोटा बदलून मिळतात?
याशिवाय, तुम्ही बँका आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कार्यालयात फाटलेल्या आणि जुन्या नोटा बदलू शकता.
तुम्ही बँकेत दररोज ५,००० च्या २० नोटा मोफत बदलू शकता.
तुम्ही एका दिवसात २० पेक्षा जास्त नोटा किंवा ५,००० पेक्षा जास्त किमतीच्या नोटा बदलून घेतल्यास, बँक त्या पावतीच्या आधारावर स्वीकारू शकते. बँक यासाठी सेवा शुल्क देखील आकारू शकते.

त्यामुळे यापुढे आरबीआयचा मेळावा असेल तर तुमच्या फाटलेल्या नोटा नक्की बदलून घ्या. 
 

Web Title: what is rbi bank note exchange mela check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.