Lokmat Money >बँकिंग > UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? या कंपनीने केली पहिल्यांदा सुरुवात

UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? या कंपनीने केली पहिल्यांदा सुरुवात

UPI Transaction : यूपीआयद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी या कंपन्या आधीच वेगवेगळ्या नावाने शुल्क आकारत आहेत. मात्र, आता ही वसुली केवळ मोबाइल रिचार्जपुरती मर्यादित राहिली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:51 IST2025-02-20T10:46:26+5:302025-02-20T10:51:04+5:30

UPI Transaction : यूपीआयद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी या कंपन्या आधीच वेगवेगळ्या नावाने शुल्क आकारत आहेत. मात्र, आता ही वसुली केवळ मोबाइल रिचार्जपुरती मर्यादित राहिली नाही.

using upi will not free of cost google pay starts charging fees for bill payments paytm phonepe | UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? या कंपनीने केली पहिल्यांदा सुरुवात

UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? या कंपनीने केली पहिल्यांदा सुरुवात

UPI Transaction : सध्याच्या काळात यूपीआय पेमेंटशिवाय आपलं पानही हलणार नाही, अशी परिस्थिती आहे. भाजीच्या जुडीपासून सॅटेलाईट डिशपर्यंत सर्व गोष्टींचे व्यवहार आता ऑनलाईन झाले आहेत. अनेकदा विक्रेताच म्हणतो की रोख नको ऑनलाईन करा. भारतात दररोज कोट्यवधी यूपीआय व्यवहार होत आहेत. बाजारात सध्या अनेक प्लॅटफॉर्म यूपीआयद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा देत आहेत. त्यातही Paytm, Google Pay आणि PhonePe हे UPI पेमेंट ॲप्स सर्वाधिक वापरले जातात. या सर्व कंपन्या UPI व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत आणि तुमचे व्यवहार विनामूल्य आहेत. पण, आता ही मोफत सेवा लवकरच बंद होणार असून यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. एका कंपनीने तर शुल्क आकारण्यास सुरुवात देखील केली आहे.

Google Pay ने ग्राहकाकडून वसूल केले १५ रुपये
यूपीआयद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी या कंपन्या आधीच वेगवेगळ्या नावाने शुल्क आकारत आहेत. मात्र, आता ही वसुली केवळ मोबाइल रिचार्जपुरती मर्यादित राहिला नाही. गुगल पेने याची सुरुवात केली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुगल पेने वीज बिल भरण्यासाठी सुविधा शुल्काच्या नावावर ग्राहकांकडून १५ रुपये घेतले आहेत. रिपोर्टनुसार, यूजरने क्रेडिट कार्डच्या मदतीने गुगल पेद्वारे वीज बिल भरले होते.

देशात UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला
डेबिट आणि क्रेडिट कार्ड ट्रांझक्शनाठी प्रोसेसिंग फी या नावाखाली गुगल पेने ग्राहकाकडून वसुली केली. विशेष म्हणजे त्यात GST देखील समाविष्ट आहे. यूपीआयचा वापर फक्त दुकानांमध्ये खरेदीसाठीच नाही तर इतर अनेक सेवांसाठीही केला जात आहे. आजच्या काळात लोक पेट्रोल-डिझेल, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, विविध प्रकारचे बिल पेमेंट, रेल्वे-फ्लाइट तिकीट, चित्रपटाची तिकिटे, फास्टॅग, गॅस बुकिंग, मनी ट्रान्सफर, मेट्रो कार्ड रिचार्ज, विमा प्रीमियम इत्यादींसाठी यूपीआय वापरत आहेत.

Web Title: using upi will not free of cost google pay starts charging fees for bill payments paytm phonepe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.