Lokmat Money >बँकिंग > UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट

UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट

UPI Transactions: नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:36 IST2025-08-06T14:35:38+5:302025-08-06T14:36:06+5:30

UPI Transactions: नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

UPI Transactions: 700 million transactions were made in a single day, twice the population of the US | UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट

UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट

UPI Record Transactions: डिजिटल इंडियामध्ये UPI ची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की, एकाच दिवसात अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट लोकांनी UPI द्वारे व्यवहार केले आहेत. २०२४ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३४ कोटी आहे, तर भारतात २ ऑगस्ट २०२५ रोजी UPI द्वारे विक्रमी ७० कोटी व्यवहार झाले.

UPI ची वेगाने वाढती लोकप्रियता
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने शेअर केलेले हे आकडे दर्शवितात की, या प्लॅटफॉर्मचा वापर वेगाने वाढला आहे. UPI ने गेल्या काही वर्षांतच हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. २०२३ मध्ये दररोज सुमारे ३५ कोटी UPI व्यवहार होत होते. तर, ऑगस्ट २०२४ पर्यंत ही संख्या ५० कोटीपर्यंत वाढली. आता ही संख्या ७० कोटी पर्यंत पोहोचली आहे.

१०० कोटी व्यवहारांचे लक्ष्य

आता सरकारचे लक्ष्य UPI द्वारे दररोजचे व्यवहार १ अब्ज (१०० कोटी) पर्यंत वाढवण्याचे आहे. असा अंदाज आहे की, जर UPI व्यवहार या दिशेने वाढत राहिले तर पुढील वर्षापर्यंत हे लक्ष्य साध्य होईल.

विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात UPI द्वारे सुमारे १९.५ अब्ज (१.९५ अब्ज) व्यवहार केले गेले, ज्याची एकूण रक्कम २५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. आता भारतात सुमारे ८५% डिजिटल व्यवहार UPI द्वारे केले जातात. इतकेच नाही तर जगभरात होणाऱ्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ५०% व्यवहार UPI द्वारे होत आहेत.

Web Title: UPI Transactions: 700 million transactions were made in a single day, twice the population of the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.