Lokmat Money >बँकिंग > UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! १५ सप्टेंबरपासून वाढणार 'या' व्यवहारांची मर्यादा, जाणून घ्या नवे नियम

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! १५ सप्टेंबरपासून वाढणार 'या' व्यवहारांची मर्यादा, जाणून घ्या नवे नियम

UPI Transaction : आता UPI व्यवहार मर्यादा वाढवण्यात येत आहे, जी १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल. पूर्वी एका दिवशी ५० हजार रुपयांच्या पुढे पैसे पाठवता येत नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:16 IST2025-09-08T14:14:10+5:302025-09-08T14:16:03+5:30

UPI Transaction : आता UPI व्यवहार मर्यादा वाढवण्यात येत आहे, जी १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल. पूर्वी एका दिवशी ५० हजार रुपयांच्या पुढे पैसे पाठवता येत नव्हते.

UPI Transaction Limit Hiked from September 15: Check New Rules | UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! १५ सप्टेंबरपासून वाढणार 'या' व्यवहारांची मर्यादा, जाणून घ्या नवे नियम

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! १५ सप्टेंबरपासून वाढणार 'या' व्यवहारांची मर्यादा, जाणून घ्या नवे नियम

UPI Transaction : गेल्या महिन्यात, ऑगस्टच्या सुरुवातीला यूपीआयच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले होते. आता पुन्हा एकदा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे होणाऱ्या मोठ्या डिजिटल पेमेंटला अधिक सोपे बनवणार आहे. होय, यावेळी व्यवहार मर्यादा वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे नवे नियम याच महिन्यापासून म्हणजेच १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत.

हे नवीन बदल विशेषतः व्यक्ती ते व्यावसायिक (P2M) व्यवहारांसाठी असतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही विमा हप्ता भरता, कर्जाचा ईएमआय भरता किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करता, अशा व्यवहारांवर याचा परिणाम होईल. मात्र, व्यक्ती ते व्यक्ती (P2P) म्हणजेच मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना पैसे पाठवण्याची मर्यादा पूर्वीप्रमाणेच दररोज १ लाख रुपये राहील, यात कोणताही बदल होणार नाही.

UPI व्यवहारांच्या मर्यादेत काय बदल होत आहेत?
एनपीसीआयने अनेक श्रेणींमधील व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे. ज्यामुळे मोठे आर्थिक व्यवहार करणे आणखी सोपे होईल.

  • भांडवली बाजार गुंतवणूक आणि विमा : आता तुम्ही प्रति व्यवहारात २ लाखांऐवजी ५ लाख रुपये आणि २४ तासांत जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकाल.
  • सरकारी ई-मार्केटप्लेस आणि कर भरणे : याची मर्यादा १ लाखांवरून वाढवून प्रति व्यवहार ५ लाख रुपये केली जाईल.
  • प्रवासाचे बुकिंग: आता १ लाखांऐवजी प्रति व्यवहार ५ लाख रुपये आणि दररोजची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत असेल.
  • क्रेडिट कार्ड बिल पेमेंट: एकावेळी ५ लाख रुपयांपर्यंत, पण दररोज जास्तीत जास्त ६ लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकाल.
  • कर्ज आणि ईएमआय भरणे: याची मर्यादा वाढवून प्रति व्यवहार ५ लाखांवरून १० लाख रुपये आणि दररोजची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत केली जाईल.
  • दागिने खरेदी: नव्या नियमानुसार, १ लाखांऐवजी प्रति व्यवहारात २ लाख रुपये आणि दररोजची मर्यादा ६ लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकाल.
  • मुदत ठेव : इथेही आता प्रति व्यवहारात २ लाखांऐवजी ५ लाख रुपये करता येतील.

वाचा - PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार

डिजिटल खाते उघडण्याच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही, ती अजूनही २ लाख रुपयेच आहे. एनपीसीआयने म्हटले आहे की, या बदलांमुळे लोकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल आणि यामुळे कॅशलेस व्यवहारांना आणखी चालना मिळेल. 
 

Web Title: UPI Transaction Limit Hiked from September 15: Check New Rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.