Lokmat Money >बँकिंग > आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ५०,००० रुपयांचे कर्ज; कसा करायचा अर्ज?

आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ५०,००० रुपयांचे कर्ज; कसा करायचा अर्ज?

Aadhar Card Loan: सरकारच्या प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ आधार कार्डद्वारेच मिळू शकते. यासाठी कोणत्याही हमी किंवा सुरक्षिततेची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:02 IST2025-01-08T13:02:46+5:302025-01-08T13:02:46+5:30

Aadhar Card Loan: सरकारच्या प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ आधार कार्डद्वारेच मिळू शकते. यासाठी कोणत्याही हमी किंवा सुरक्षिततेची गरज नाही.

under the pm swanidhi scheme loan up to 50 thousand is available through aadhar card | आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ५०,००० रुपयांचे कर्ज; कसा करायचा अर्ज?

आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ५०,००० रुपयांचे कर्ज; कसा करायचा अर्ज?

Aadhar Card Loan : सर तुम्हाला पर्सनल लोनची ऑफर आहे, असा एखादा तरी कॉल तुम्हालाही दोनचार दिवसांत येत असेल. पण, प्रत्यक्षात कर्जासाठी अर्ज केला तर लक्षात येईल की किती कटकट आहे. कोणतीही बँक हमीशिवाय कर्ज देत नाही. पण, आता तुम्हाला केवळ आधारकार्डवर हमीशिवाय ५० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तुमचाही यावर विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे अगदी खरे आहे. आधार कार्डद्वारे तुम्हाला ५०००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. कोविड काळात २०२० मध्ये सरकारने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजना सुरू केली होती. छोटे व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवणे हा त्याचा उद्देश होता.

कर्ज फेडायला १२ महिन्यांचा मुदत
या योजनेअंतर्गत छोटे व्यावसायिक कोणत्याही हमीशिवाय आधार कार्डवर कर्ज घेऊ शकतात. पण, ही योजना चालते कशी? याची परतफेड कशी करायची असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील. यामध्ये व्यावसायिकांना प्रथम १०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. जर त्यांनी त्याची वेळेवर परतफेड केली, तर पुढच्या वेळी त्यांना २०,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि जर त्यांनी तेही वेळेवर परतफेड केली तर कर्जाची रक्कम ५०,००० रुपये केली जाते. कर्जाची परतफेड १२ महिन्यांत हप्त्यांमध्ये करावी लागते.

कर्जासाठी कुठे करायचा अर्ज?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही थेट पोर्टलवर किंवा तुमच्या क्षेत्रातील कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. कारण तुम्ही कर्जासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास व्हेरिफिकेशनसाठी त्याची गरज लागेल.

आधार कार्डवर कर्ज घेण्यासाठी काय पात्रता आहेत?
कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडून शिफारस पत्र घ्यावे लागेल. जेणेकरुन त्यांना भविष्यात सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. या योजनेअंतर्गत, कर्ज घेणाऱ्यांच्या चार श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी, व्यक्तींनी पोर्टलवर त्यांची पात्रता स्थिती तपासली पाहिजे.

कर्जावर किती व्याज द्यावे लागेल?
व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB), लघु वित्त बँका (SFBs) आणि सहकारी बँकांचे व्याजदर सध्याच्या दरांनुसार असतील. तर एनबीएफसी, एनबीएफसी-एमएफआई इत्यादींसाठीचे व्याजदर त्यांना दिलेल्या RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरवले जातील. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत समाविष्ट नसलेल्या इतर कर्जदारांच्या श्रेणींसाठी, NBFC-MFI साठी सध्याच्या RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्याजदर निर्धारित केले जातील.

Web Title: under the pm swanidhi scheme loan up to 50 thousand is available through aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.