Mahindra Thar On EMI: भारतीयांमध्ये महिंद्रा थारबद्दलची ओढ दिवसेंदिवस वाढत आहे. ही गाडी आता केवळ तरुणांचीच पसंती राहिलेली नाही, तर सर्व वयोगटातील लोक आणि महिलांमध्येही ती प्रचंड लोकप्रिय होत आहे. यामुळेच आज भारतीय रस्त्यांवर थारची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. जर तुम्हीही महिंद्रा थार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कार लोन संदर्भात संभ्रमात असाल, तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
किती असावा मासिक पगार?
देशात सध्या साधारणपणे ८.५ टक्के ते १५ टक्क्यांच्या दरम्यान व्याजानं कार लोन उपलब्ध आहे. कार लोन मिळवण्यासाठी तुमची वार्षिक उत्पन्न किमान ३ लाख रुपये, म्हणजेच मासिक पगार किमान २५,००० रुपये असणं आवश्यक आहे. बँका साधारणपणे त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या मासिक पगाराच्या ४८ पट इतके कर्ज देऊ शकतात. उदाहरणार्थ, जर तुमचा मासिक पगार ५०,००० रुपये असेल, तर तुम्हाला ५०,००० x ४८ = २४,००,००० रुपयांपर्यंतचं कार लोन मिळू शकतं.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पाहा काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर; LPG ची स्थिती काय?
दरमहा किती भरावा लागेल EMI?
महिंद्रा थारची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपयांपासून १७.१९ लाख रुपयांपर्यंत आहे. दिल्लीमध्ये या गाडीची ऑन-रोड किंमत १२ लाख रुपयांपासून २१.२० लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला २१.२० लाख रुपयांच थारचं टॉप मॉडेल खरेदी करायचं असेल आणि तुमचा पगार ५०,००० रुपये असेल, तर तुम्हाला २४ लाख रुपयांपर्यंत कर्ज सहज मिळू शकतं.
परंतु, समजा तुम्ही ५ लाख रुपयांचं डाउन पेमेंट केलं, तर तुम्हाला साधारण १६.२० लाख रुपयांच्या कर्जाची गरज पडेल. जर तुम्हाला ८.५% व्याजदरानं ५ वर्षांसाठी हे कर्ज मिळालं, तर तुम्हाला दरमहा सुमारे ३३,८५२ रुपये ईएमआय (EMI) भरावा लागू शकतो.
