Lokmat Money >बँकिंग > बंद झालेली २००० रुपयांची नोट अजूनही जमा करता येईल? आरबीआयकडून मोठी अपडेट

बंद झालेली २००० रुपयांची नोट अजूनही जमा करता येईल? आरबीआयकडून मोठी अपडेट

RBI On Rs 2000 Note : भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करुन दीड वर्ष झाले आहेत. तरीही अद्याप जवळपास ७००० कोटी रुपयांची नोटा येणे बाकी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:02 IST2025-01-02T11:01:30+5:302025-01-02T11:02:21+5:30

RBI On Rs 2000 Note : भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करुन दीड वर्ष झाले आहेत. तरीही अद्याप जवळपास ७००० कोटी रुपयांची नोटा येणे बाकी आहेत.

rs 2000 notes withdrawal rbi update rs 6691 crore worth such notes still with public till now | बंद झालेली २००० रुपयांची नोट अजूनही जमा करता येईल? आरबीआयकडून मोठी अपडेट

बंद झालेली २००० रुपयांची नोट अजूनही जमा करता येईल? आरबीआयकडून मोठी अपडेट

RBI On Rs 2000 Note : तुमच्याकडे अजूनही २००० हजार रुपयांची नोट कुठे असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. देशात गुलाबी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, तरीही संपूर्ण नोटा परत आलेल्या नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या नोटांबाबत एक मोठी अपडेट प्रसिद्ध केली आहे. लोकांकडे अजूनही ६६९१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या चलनी नोटा असल्याचे आरबीआयने म्हटलं आहे. केंद्रीय बँकेच्या म्हणण्यानुसार, चलनातून बाद केल्यानंतर ९८.१२ टक्के नोटा परत आल्या आहेत.

दोन महिन्यांत ४२६ कोटी परत आले   
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने २००० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची माहिती शेअर करताना ही आकडेवारी जाहीर केली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर त्यांचा परत येण्याचा वेग खूप होता. मात्र, नंतर यात मंदी आली. दोन महिन्यांच्या कालावधीत केवळ ४२६ कोटी रुपये परत आले आहेत, यावरूनही याचा अंदाज लावता येईल. आरबीआयने १ ऑक्टोबर रोजी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, ७११७ कोटी रुपयांच्या गुलाबी नोटा बाजारात होत्या, ज्या ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ६६९१ कोटी रुपये होत्या.

२००० च्या नोटा कधी आणि का बंद केल्या?
क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत, आरबीआयने १९ मे २०२३ रोजी देशात चलनात असलेली २००० रुपयांची नोट मागे घेण्याची घोषणा केली होती. यानंतर, केंद्रीय बँकेने स्थानिक बँका आणि आरबीआयच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या नोटा परत करण्यासाठी आणि बदलण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वेळ दिला होता. मात्र, त्यानंतर ही मुदत सातत्याने वाढवली जात होती.

अजूनही २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकता?
२ हजार रुपयांच्या नोटा अजूनही बदलल्या जाऊ शकतात. होय, तुम्ही बरोबर वाचले, स्थानिक बँकांमध्ये हे शक्य होणार नाही. केंद्रीय बँकेने आधीच स्पष्ट केले आहे की चलनातून बाहेर काढलेल्या या गुलाबी नोटा आरबीआयच्या १९ कार्यालयांमध्ये जमा केल्या जातील. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुअनंतपुरम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, लोक त्यांच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये नोटा जमा करू शकतात.

पहिल्या नोटाबंदीनंतर या नोटा बाजारात आल्या
सरकारने चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्रीय बँकेने २,००० रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. यानंतर, बँकांमध्ये इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर, २,००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यामुळे २०१८-१९ मध्ये २,००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती, असे आरबीआयने म्हटले आहे.

Web Title: rs 2000 notes withdrawal rbi update rs 6691 crore worth such notes still with public till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.