RBI Sells Dollars : २०२५ हे वर्ष भारतीय चलन रुपयासाठी सर्वात वाईट ठरलं आहे. यंदा रुपया आशियातील सर्वात कमकुवत चलन राहिलं आहे. जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली तिजोरी उघडली आहे. ऑक्टोबर महिन्यात रिझर्व्ह बँकेने शुद्ध स्वरूपात ११.८८ अब्ज डॉलर्सची विक्री केली आहे. डिसेंबर २०२४ नंतरची ही एका महिन्यातील सर्वात मोठी विक्री असून, रुपयाला ९१ च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवरून सावरण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
डॉलरची खरेदी-विक्री आणि आरबीआयचा हस्तक्षेप
रिझर्व्ह बँकेने आपल्या मासिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार,
- ऑक्टोबरमधील विक्री : २९.५६ अब्ज डॉलर्स.
- ऑक्टोबरमधील खरेदी : १७.६९ अब्ज डॉलर्स.
- शुद्ध विक्री : ११.८८ अब्ज डॉलर्स.
- सप्टेंबर महिन्यात ही विक्री ७.९ अब्ज डॉलर्स इतकी होती, ज्यावरून रुपयावरील दबाव वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
१३ वर्षांत ९० टक्क्यांनी घसरला रुपया
- रुपयाची ही घसरण केवळ तात्पुरती नसून दीर्घकालीन आकडेवारी धक्कादायक आहे.
- २०१२ ची स्थिती : डॉलरच्या तुलनेत रुपया ४८ च्या पातळीवर होता.
- सध्याची स्थिती : रुपया ९१ च्या पार गेल्याने, गेल्या १३ वर्षांत त्याचे मूल्य सुमारे ९० टक्क्यांनी कमी झाले आहे.
- वार्षिक सरासरी : २०१७ पासून रुपयाच्या मूल्यात दरवर्षी सरासरी ४ टक्क्यांची घट होत आहे.
रुपयाच्या घसरणीची प्रमुख कारणे
- परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची माघार : भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतल्याने रुपयावर दबाव आला.
- व्यापार कराराला विलंब : भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित ट्रेड डीलला होणाऱ्या विलंबामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
- आशियातील सुमार कामगिरी : एकेकाळी आशियातील सर्वात स्थिर चलन मानला जाणारा रुपया, आता या वर्षातील 'सर्वात वाईट कामगिरी' करणारे चलन ठरले आहे. इंडोनेशियाचा 'रुपिया' या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वाचा - 'या' पठ्ठ्याने वर्षभरात कंडोमवर उडवले १ लाख रुपये; इन्स्टामार्टच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी उघड
सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?
- रुपया कमकुवत झाल्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि खिशावर होतो.
- महागाईचा भडका : आयात केल्या जाणाऱ्या वस्तू (उदा. कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक्स) महाग होतात, ज्यामुळे देशांतर्गत महागाई वाढते.
- शेअर बाजार : रुपया घसरल्याने परदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत होतो, ज्याचा फटका शेअर बाजाराला बसतो.
