RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांना मोठा दिलासा देत रेपो रेटमध्ये 0.25% ची कपात जाहीर केली आहे. याचा फायदा कार खरेदीदारांना मिळणार आहे. रेपो रेट कमी होताच बँका त्वरित कर्जावरील व्याजदर कमी करतात, ज्यामुळे कार लोनची EMI देखील आपोआप घटते.
यापूर्वी RBI ने 2025 मधील फेब्रुवारी, एप्रिल आणि जून महिन्यांत रेपो रेट कमी केला होता. आता झालेल्या नव्या कपातीनंतर कार लोन अधिक स्वस्त झाले आहे.
SBI च्या कार लोनवरील नव्या व्याजदरात बदल
SBI च्या अधिकृत वेबसाइटनुसार 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार लोनचा व्याजदर 8.75% होता. RBI च्या 25 बेसिस पॉइंट कपातीनंतर हा दर घटून 8.50% झाला आहे. ही छोटी वाटणारी कपातसुद्धा EMI वर मोठा फरक निर्माण करते.
10 लाख, 15 लाख आणि 20 लाखांच्या कार लोनवर नवीन EMI किती?
1) 10 लाखांचे कार लोन (5 वर्षे कालावधी)
जुनी EMI (8.75%): ₹20,673
नवी EMI (8.50%): ₹20,517
मासिक बचत: ₹156
2) 15 लाखांचे कार लोन
जुनी EMI: ₹30,956
नवी EMI: ₹30,775
मासिक बचत: ₹181
3) 20 लाखांचे कार लोन
जुनी EMI: ₹41,274
नवी EMI: ₹41,033
मासिक बचत: ₹241
ग्राहकांना कसा फायदा?
EMIमध्ये प्रत्येक महिन्याला काहीशे रुपयांची घट दिसत असली तरी, वर्षभरात ही बचत एकत्रितपणे मोठी रक्कम बनते. कार खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा योग्य काळ मानला जात आहे.
