Lokmat Money >बँकिंग > ATM मधून पैसे काढताना सावधान! जर तुम्ही १५ सेकंद चुकले तर रोख रक्कम मिळणार नाही

ATM मधून पैसे काढताना सावधान! जर तुम्ही १५ सेकंद चुकले तर रोख रक्कम मिळणार नाही

cash retraction facility : आरबीआयने पैसे काढण्याच्या सुविधेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएममधील हे इनबिल्ट वैशिष्ट्य डिसएबेल करण्याच्या पूर्वीच्या सूचना अंशतः मागे घेतल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:31 IST2024-12-05T13:31:00+5:302024-12-05T13:31:49+5:30

cash retraction facility : आरबीआयने पैसे काढण्याच्या सुविधेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएममधील हे इनबिल्ट वैशिष्ट्य डिसएबेल करण्याच्या पूर्वीच्या सूचना अंशतः मागे घेतल्या आहेत.

rbi partially reversed an earlier directive to disable cash retraction facility in atms | ATM मधून पैसे काढताना सावधान! जर तुम्ही १५ सेकंद चुकले तर रोख रक्कम मिळणार नाही

ATM मधून पैसे काढताना सावधान! जर तुम्ही १५ सेकंद चुकले तर रोख रक्कम मिळणार नाही

cash retraction facility : देशात यूपीआय पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. परिणामी रोख व्यवहार कमी झाल्याने एटीएममशीनमधून पैसे काढण्याचं प्रमाणंही घटलं आहे. मात्र, तुम्ही अजूनही काही कारणांसाठी एटीएममधून रोख रक्कम काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एटीएममधील एका त्रुटीचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा एकदा ग्राहकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे. आरबीआयने रिट्रेक्शन फॅसिलिटी डिसएबेल करण्याचा आपला १२ वर्षांपूर्वी दिलेला नियम अंशतः मागे घेतला आहे.

वास्तिवक, फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी हे फीचर जानेवारी २०१२ मध्ये बंद करण्यात आले होते. TOI च्या रिपोर्टनुसार, RBI ने ATM मधून पैसे काढताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी पैसे काढण्यासाठी रिट्रेक्शन सुविधा सुरू केली होती. आता जिथे अशी फसवणुकीची शक्यता आहे. तिथेच ही सुविधा लागू होईल.

रिट्रेक्शन फॅसिलिटी काय आहे?
वास्तविक, एटीएममध्ये रोख रक्कम काढण्याची सुविधा हे इनबिल्ट फीचर आहे. ग्राहकाने वेळेत डिस्पेंसरमधून नोटा घेतल्या नाहीत तर मशीन चलनी नोटा पुन्हा मागे घेते. यापूर्वी, जेव्हा मशीनमधून रोख रक्कम घेतली नाही तर नोटा परत घेतल्याचे नोंद होत होती. याचा फायदा काही भामटे करत होते. ते मशीनमधून आलेल्या रोख रकमेतून काही नोटा उचलत असत. पण, मशीनमध्ये नोटा माघारी घेताना ती नोंद होत नव्हती. ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला होता. यात बनावट शटर ओव्हरले फसवणूक करण्यात आला. म्हणजे गुन्हेगारांनी जिथून पैसे बाहेर येतात. तिथे बनावट कव्हर लावलं होतं. ज्यामुळे काढलेली रोकड अडकली. व्यवहार अयशस्वी झाल्याचा विचार करून ग्राहक निघून गेला. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी ते पैसे काढून पोबारा केला. रोख पैसे काढणे पुन्हा सक्षम करून, फसवणूक करणाऱ्यांनी मशीनला लक्ष्य केल्यास ग्राहकांना त्यांची रोख रक्कम परत मिळण्यासाठी ही चांगली संधी आहे.

एनपीसीआयने भारताच्या ATM नेटवर्कचे व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल फायनान्शिअल स्विचच्या सर्व सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बनावट शटर कव्हरशी संबंधित फसवणुकीच्या उपायांवर चर्चा केल्यानंतर, उद्योग सदस्य, बँका आणि ATM कंपन्यांनी त्यांच्या शिफारसी मांडल्या. या सर्व शिफारसी RBI ला पाठवण्यात आल्या आहे.

रिट्रेक्शन फॅसिलिटी काय आहे?
एटीएममध्ये रोकड मशीनद्वारे मागे घेण्याची सुविधा म्हणजे रिट्रेक्शन फॅसिलिटी होय. ग्राहकाने वेळेवर डिस्पेंसरमधून रोख रक्कम उचलली नाही, तर मशीन पैसे परत घेते.
 

Web Title: rbi partially reversed an earlier directive to disable cash retraction facility in atms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.